डॉ उत्तम पाचारणे यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार मरणोपरांत प्रदान

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज जहांगीर कलादालन मुंबई येथे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १३२ व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिल्पकार दिवंगत डॉ उत्तम पाचारणे यांना सोसायटीचा ‘रुपधर जीवन गौरव पुरस्कार’ मरणोपरांत प्रदान करण्यात आला.   

राज्यपालांच्या हस्ते निवड झालेल्या कलाकारांना बेंद्रे – हुसेन शिष्यवृत्ती, संगीता जिंदल शिष्यवृत्ती व संध्या मिश्रा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या, तसेच ‘महाराष्ट्र राज्यपाल पुरस्कार’ प्रदर्शनातील विजेत्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

उदघाटन सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार मनोज जोशी, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रजीत यादव, विक्रांत मांजरेकर, सुरेंद्र जगताप, कलाकार, कलाप्रेमी व पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

Wed Feb 28 , 2024
पुणे :- भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असतो. त्याचाच भाग म्हणून भारतीय रिझर्व बँक, जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताह अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुभान बाशा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com