बुटीबोरी येथे शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

संदीप बलविर,प्रतिनिधी

समीर कुंभारे यांनी पटकाविला बुटीबोरी श्री चा पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य

स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

नागपूर :- मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारे,रयतेचे राजे,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुटीबोरी येथील स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था यांचेकडून बुटीबोरी नगरीत प्रथमच शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात आर बी फिटनेस चे समीर कुंभारे यांनी प्रथम क्रमांक पटकावित बुटीबोरी श्री चा मान पटकाविला.

बुटीबोरी शहरात प्रथमच आयोजित या शरीर सौष्ठव स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या एकूण २० स्पर्धकांमधून आर बी फिटनेस चे समीर कुंभारे यांनी प्रथम क्रमांक पटकावत बुटीबोरी श्री चा मान पटकाविला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अविनाश वागुळे यांनी आपली भूमिका निभावली.या प्रसंगी बुटीबोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, नगराध्यक्ष बबलू गौतम, संस्थेचे अध्यक्ष आकाश दादा वानखेडे, बुटीबोरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, सभापती मुन्ना जयस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, मंगेश आंबटकर, महेंद्रसिंह चौहान, दीपक गुर्जर व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे संचालन सुमित मेंढे व ऋषी जयस्वाल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सचिन चंदेल, तुलेश ठाकरे, लोकेश मामुळकर, रुपेश इचकाते, ओम आंबटकर, नयन गुल्हाने, दीपक बन, विकी बारसागडे, अक्षय कुबेर यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

Sun Feb 19 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळेत 19 फेब्रुवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवाजी महराज यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण प्रस्तुत केले तसेच पोवाडा च्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज,अफझल खान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com