– कॅमेऱ्यात T – 65 वाघीनी च्या तोंडात दिसले शावक
रामटेक – पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर मधील देवलापर वन परिक्षेत्रात बांद्रा खुर्सापार रस्त्यावर T-65 या वाघिणीने काल संध्याकाळी एक बछडा (अंदाजे वय १ महिना) शेपटीच्या बाजूने उचलून नेल्याचे वन रक्षक चेतन उमाठे यांनी सांगितले. नमूद घटनेनुसार सदर बछडा मृत असण्याची शक्यता होती.
आज सकाळी सदर क्षेत्रात गस्त करण्यात आली असता वाघीण शावकासोबत असल्यामुळे १० जणांचा चमू पाठवण्यात आला. सदर गस्तीत बांद्रा नियतक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ येथे वाघिणीच्या जवळच्या भागात एका बछाड्याचे मृत शरीर अर्धवट स्वरूपात खाल्लेले दिसून आले. वाघीण मोठ्या आवाजात गुरकत असल्याने चमू तेथून निघून आला. वाघीण त्या क्षेत्रातून निघून गेल्यानंतर NTCA SOP नुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. अधिक बाबी स्पष्ट होण्यासाठी सदर भागात Camera Trap लावण्यात येत असून गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.