संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बोधिमंग्गो कम्युनिटी किचन निर्माण झाल्यामूळे गरजु लोकाना उपाशी पोटी रहाव लागणार नाही एक सामाजिक धार्मिक दायित्व साकारण्याचा धेय्य बोधीमंग्गो सेवा संस्था आणी डाॅ बाबासाहब आंबेडकर असोसिएशन ऑफ नार्थ अमेरिका यानी ऋणानूबंध म्हणुन स्वीकारला आहे आपण सुध्दा दायित्व म्हणुन तन मन धन देऊन विकासकार्यात मदत केली तर अधिक भर पडेल असे उदगार ई.जी. राजकुमार बडोले माजी कैबिनेट मंत्री यानी उद्घाटन निमित्त व्यक्त केले.
आज भदंत बोधिविनीत जन्मदिन व बाबू हरदास एल एन जन्मदिन निमित्त बोधिमंग्गो महाविहार भदंत बोधिविनीत परीसर भीमनगर ईसासनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत विनयरंख्खीत महास्थविर होते उपरोक्त कार्यक्रमाला भदंत विमलधम्म महास्थविर श्रीलंका भदंत धम्मदर्शी थेरो श्रीलंका भदंत प्रियदर्शी महास्थविर भदंत डाॅ ज्ञानदिप महास्थविर भदंत डाॅ धम्मसेवक महास्थविर भदंत बोधानंद महास्थविर,भदंत एन सुगतबोधी महास्थविर भदंत प्रज्ञाज्योती महास्थविर भदंत ज्ञानबोधो महास्थविर भदंत संघकिर्ती महास्थविर भदंत धम्मीको, भदंत जिवनदर्शी आदी भीक्खुगण सह दि बुद्धिष्ट सोसाइटी.ऑफ इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष चद्रबोधो पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवर अतिथीचे भदंत बोधिविनीत आणी बाबू हरदास एल एन याच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन झाले, उपरोक्त कार्यक्रमात भीक्खुसंघास भोजन दान संघदान देण्यात आले व नागरीकाना भोजन दान देण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ भदंत सिलवंस महास्थविर यानी केले संचालन व आभार भदंत नागदिपांकर महास्थविर यानी केले पाहुण्याचे स्वागत शंकरराव निकोसे अनिल मेश्राम यानी केले
उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यात बोधिमंग्गो संन्डे स्कुल, व परिसरातील उपासक उपासिका सहदायक जोर आई काबळे आनंद ईगळे आणी परिवार श्रामनेर छंदको कम्बोडीया, महानाम ,सारीपुत्त ,मोगल्यायन, अश्वजित, सिध्दी साखरे, रक्ष्मी पाटील, प्रज्ञा मेश्राम, आचल वासनिक, ज्ञानेश्वर, मयूरी खोबरागडे, प्रिती पाटील, सूनिल यांनी मोलाची भूमिका साकारली.