नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या दि. २५.०६.२०२४, मंगळवार रोजी झालेल्या १२१६ व्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी

नागपूर :- २५ जून नागपूर सुधार प्रन्यास येथे विश्वस्त मंडळाची १२१६ सर्वसाधारण सभा आज दि. २५.०६.२०२४, मंगळवार रोजी पार पडली. सदर स्थित नासुप्रच्या मुख्यालयात पार पडलेल्या या सभेत नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त संजय मीणा (भाप्रसे), नासुप्र चे विश्वस्त तथा दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, नासुन विश्वस्त संदिप इटकेलवार तसेच नगररचना विभागाच्या सहसंचालक तथा नासुप्र विश्वस्त  प्र. भा. गावंडे उपस्थित होते. या सभेत विश्वस्त मंडळाने विविध विषयांना मान्यता प्रदान केली.

• मौजा वाठोडा, खसरा क. ४६/३, ४७, त्रिभुवन को. ऑप हाऊसिंग सोसायटी या जागेत असलेले SPORTS COMPLEX चे आरक्षण या अभिन्यासातील P.U, OPEN SPACE, व यालगत असलेल्या भुखंड १७१ ते १७६ वर स्थानांतरीत झाल्याने सदर स्थानांतरीत SPORTS COMPLEX चे आरक्षणाने बाधीत भुखंड क. १७१ ते १७६ अशा एकूण ६ भुखंडांना TDR देण्याबाबत विश्वस्त मंडळाने ठरविले.

• मंजूर विकास योजनेत मौजा बाबूलखेडा, खसरा क ५१/१.२ येथील काशी नगर कृती समिती या अनधिकृत अभिन्यासातील मंजूर विकास योजनेनसार “व्हेजीटेबल मार्केट/शॉपिग सेंटर (आ.क.एस-१४३) क्षेत्र ३.१९५७ हेक्टर आर व सिटी स्ट्रान्सपोर्ट (आ.क. एस-१४४) क्षेत्र ०.६५९२ हेक्टर आर व १५.०० मी. रुंद डि.पी. रस्ता क्षेत्र ०.१४९६ हेक्टर आर” जागा या आरक्षणाने प्रस्तावित असलेली जागा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये कार्यवाही करून निवासी उपयोगात समाविष्ट करण्याचे विश्वस्तांनी मंजूरी प्रदान केली.

नागपूर मेट्रो टप्पा क. १ प्रकल्पाकरीता नागपूर सुधार प्रन्यासने महा मेट्रोला ३७६७९.७९ चौ.मी क्षेत्रफळच्या १२ जमिनी बिनशर्त मालकी हक्काने दिर्घ भाडेपट्टयाने (९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने) देण्यास्तव तसेच या पोटी अनुज्ञेय भुईभाडे माफ करण्याकरीता नागपूर सुधार प्रन्यास जमिन विल्हेवाट नियम १९८३ च्या अनुच्छेद २६ अन्वये पाच वर्षापर्यंत वसुलीस शिथिलता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास मंजूरीकरीता सादर करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले, शासना कडून सदर प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

खसरा क. ४८, मौजा सक्करदरा अभिन्यासातील सोनझरी लोकांचे भुखंड क. ६५ व ६६ या भुखंडावर ३० ते ४० वर्षापासून अतिक्रमण करून वास्तव्य करीत असल्याने, शासन निर्णय क. नासुप्र २२९५/प्र.क. १९९/नवि.२६, दि. ०७.०६.१९९६ अन्वये प्रन्यासला दिलेल्या अधिकारानुसार दोन्ही अतिक्रमणकारींना नासुप्र जमिन विनियोग नियम १९८३ मधील नियम क. ७ (३) नुसार दर निर्धारण समिती कडून दर निश्चित करून अतिक्रमणकारी यांचेकडून प्रव्याजीची रक्कम वसुल झाल्यानंतर भुखंड वाटप करण्यास विश्वस्त मंडळाने मंजूरी दिली.

“शासन निधी अंतर्गत रू. ३.५८/- कोटीचे आणि नासुप्र निधि अतंर्गत रू. २२.०३ कोटी किंमतीचे विकास कामांना मान्यता.”

महानगर पालिका क्षेत्रातील मुलभुत सोई सुविधांचा विकास या योजने अंतर्गत मौजा बाबुलखेडा येथे रामटेके नगर पासून ते ओमकार नगर सिमेंट रोड पर्यंत १५.०० मी. रुंद सिमेंट कॉकीट रोडचे रू. ३.५८/- कोटीचे शासन निधी अंतर्गत बांधकाम.

• १९०० ले-आऊट विकास निधी अंतर्गत मौजा दाभा, मौजा मानकापूर पोलीस लाईन टाकळी आणि झिंगाबाई टाकळी येथे विविध ले-आऊट मध्ये सिव्हर लाईन टाकण्याचे रू. १.४५/- कोटीचे कामे.

• दलितेत्तर निधी अंतर्गत उत्तर नागपूर समता नगर मध्ये  चिचखेडे यांचे घरापासून ते विजया हजारे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे रू. १.०८/- कोटीचे बांधकाम.

• १९०० लेआऊट निधी अंतर्गत मौजा दिघोरी, मौजा मानेवाडा प्रभाग क. ३४ मध्ये शाहु नगर पासून ते तपस्या कॉन्व्हेट सी.सी. रोड, केशव हॉस्पीटल रिंग रोड पासून ते विज्ञान नगर सी.सी. रोड पर्यंत विविध ले-आऊट मध्ये सिमेंट कॉकीट रोडचे १९.५०/- कोटीचे बांधकाम.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन 

Wed Jun 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त नगर परिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक लालसिंग यादव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले. माजी नगरसेवक प्रतिक पडोळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी संजय कनोजिया,उज्वल रायबोले, रमेश वैद्य, मंगेश यादव, राजन सोमकुंवर,विक्की बोंबले,पल्लवी हुमने, कौशल्या शर्मा, रत्नमाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com