शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – एप्रिल 2022 चा नुकताच निकाल लागला असून, विद्यार्थी आणि पालकांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचणी येत असल्यास त्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवा सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी समुपदेशन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय सचिव चिंतामन वंजारी यांनी केले आहे.

            निकाल जाहीर झाल्यापासून ते निकाल वितरण होण्याच्या दिनांकापर्यंत त्यांना निकालासंबंधी आवश्यक व महत्त्वाची माहिती विचारता यावी, यासाठी संकेतस्थळावरून विभागीय मंडळाच्या कार्यालयामार्फत मदत कक्ष व समुपदेशन सेवा बारावीसाठी 0712-2553507 आणि दहावीसाठी 0712-2553503 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली आहे.

            नागपूर‍ विभागातील जिल्हानिहाय दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरसाठी  विशाल गोस्वामी (8275039252) आणि प्रतिमा मोरे (9028066633), वर्धासाठी पी. के. शेकार (9766917338) आणि वि. दा. पाटील (9823438205), भंडारासाठी गायत्री भुसारी (9011062355) आणि नरेंद्र चौधरी (9405517541), गोंदियासाठी मिलींद रंगारी (9404860735) आणि एल. एच. लांजेवार (7507099136), चंद्रपूरसाठी सतीश पाटील (9421914353) आणि आर. एन. रहाटे (7588890187), गडचिरोलीसाठी डी. एम. जवंजाळ (9421817089) आणि ए. एल. नुतिलकंठावार (9421732956) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सोयाबीन पिकाच्या खरीप पेरणीबाबत शेतक-यांना कृषि विभागाचे आवाहन

Sat Jun 11 , 2022
 नागपूर :  खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी व 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरून पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहसंचालकांनी शेतकऱ्यांना केले आहे.             प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पध्दतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी.  पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!