एकाच दिवशी रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान

– ना.मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

– पालकमंत्री महारक्तदान यज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

– ना.मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम

चंद्रपूर :- रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राजकारणात नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यमान कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील हजारो लोकांनी रक्तदान करून रविवारी साजरा केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे संपूर्ण जिल्ह्यात ना.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री महा रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले.यात चंद्रपूर, वरोरा,बल्लारपूर,पोंभुरणा,मूल,गोंडपीपरी,राजुरा तालुका येथील भाजपा कार्यकर्त्यांनी हिरीरीने भाग घेतला.महानगरात गिरनार चौक,संत रविदास सभागृह जुनोना,समाजभवन बंगाली कॅम्प, महेश भवन तुकुम,शिवपार्वती सभागृह,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,विमलादेवी आयुर्वेदिक महाविद्यालय व पडोळी या 8 ठिकाणी रक्तदान शिबिरआयोजित करण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीने यात महत्वाची भूमिका बजावली.सकाळी 9.30 ला जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान सुरू झाल्यावर दुपार पर्यंत 2003 रक्तदात्यांनीं रक्तदान केले,हा आकडा 6 वाजता 4100 वर पोहीचला व रक्तदान सुरूच होते,अशी माहिती ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचे मुख्य संयोजक डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिली.

राक्तदात्यांचे शपथपत्र चर्चेचा विषय

आयोजकांनी रक्तदात्यांसाठी एक शपथपत्र तयार केले.या शपथपत्रानुसार यानंतर हे रक्तदाते गरजूंना रक्तदान करून सामाजिक ऋण फेडणार आहेत.तसेच लोकजागृती करून इतरांनाही ते प्रोत्साहन देतील.सर्व रक्तदात्यांना शासकीय प्रमाणपत्र व ना.मुनगंटीवार यांचे एक अभिनंदन पत्र देण्यात आले.

यशस्वीतेसाठी यांनी केले परिश्रम

पालकमंत्री महा रक्तदान यज्ञ हे अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ मंगेश गुलवाडे,राहूल पावडे,हरीश शर्मा,राजेंद्र गांधी,प्रमोद कडू,प्रकाश धारणे,रवी लोणकर,सुभाष कासंगोट्टूवार,विठ्ठल डुकरे,विशाल निंबाळकर,सचिन कोतपल्लीवार,ब्रिजभूषण पाझारे,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,अजय सरकार, रामपाल सिंह,शैलेश दिंडेवार,डॉ संदेश गोजे व किरण बुटले यांनी परिश्रम घेतले.

आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी थोपटली पाठ

महानगरात सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री महा रक्तदान अभियान सुरू झाल्यावर चंद्रपुर,गडचिरोली व वर्धाचे विधानपरिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर यांनी दिवसभर शिबीर स्थळी भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस केली.यावेळी त्यांनी परिश्रम घेणाऱ्यांची पाठ थोपटली.

ग्रामीण चंद्रपूरातही झाले महा रक्तदान यज्ञ

महानगरात 8 ठिकाणी महा रक्तदान यज्ञ पार पडत असताना ग्रामीण भागातही रक्तदात्यांनी एकच गर्दी केली यात बल्लारपूर,गोंडपीपरी,मूल,जनासुरला,भद्रवती,वरोरा,विसापूर,कोठारी,चुनाळा,दुर्गापूर,जिवती,पाळसगाव,बामणी,गडचांदूर व पडोळी येथील रक्तदात्यांच्या समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1 ऑगस्टला महसूल दिन, महसूल सप्ताहात होणार विविध उपक्रमांचे आयोजन

Mon Jul 31 , 2023
भंडारा :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येत आहे. त्यासोबतच 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. 1 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा उपक्रम – या कार्यक्रमात अतिवृष्टी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com