– पुरुष गटातही मारली बाजी
– वरिष्ठ गटाची जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा
नागपूर :- जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या सहकार्याने आयोजित वरिष्ठ गटाच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद ६७ गुणांसह कामठीच्या बीकेसीपीई क्लबने प्राप्त केले. तर पुरुष गटातही या क्लबने बाजी मारली. महिला गटात हिंगण्याच्या एचटीकेबीएसने जेतेपद प्राप्त केले.
मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद कामठीच्या बीकेसीपीई संघाने प्राप्त केले. तर दुसरे स्थान नागपूरच्या ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स क्लबने ४२ गुणांसह तिसरे स्थान १४ गुणांसह हिंगण्याच्या एचटीकेबीएसने प्राप्त केले. पुरुष गटात ६० गुणांसह बीकेसीपीईने बाजी मारली. तर ४४ गुणांसह नागपूरच्या नाह्म्या फाउंडेनशनने दुसरे स्थान तर तिसरे स्थान ट्रॅकस्टार अॅथलेटिक्स क्लबने ३५ गुणांसह प्राप्त केले. महिला गटात १० गुणांसह हिंगण्याच्या एचटीकेबीएसने जेतेपद प्राप्त केले. तर ९ गुणांसह नागपूरच्या क्लिक अँड क्लाउडने दुसरे स्थान आणि ७ गुणांसह तिसरे स्थान बीकेसीपी शाळेने प्राप्त केले.
स्पर्धेत १५०० मीटर धावण्यात ट्रॅक स्टार क्लबच्या रिया दोहतरेने ५ मि. ६.७८ सें. एवढी वेळ नोंदवित अव्वल स्थान प्राप्त केले. द्वितीय स्थान एचटीकेबीएस हिंगणाने ५ मि. ४३.३८ गुणांसह प्राप्त केले. तिसरे स्थान ट्रॅक स्टारच्या गीतल सोनेकरने ५ मि. ७.४ सेंकदासह प्राप्त केले. पुरुष गटात ट्रॅक स्टार क्लबच्या सौरभ तिवारीने ३ मि. ५८.७३ एवढी वेळ देत प्रथम स्थान प्राप्त केले. त्याचा सहकारी राजन यादवने ३ मि. ५९.५९ सें. वेळ नोंदवित दुसरे स्थान व तिसरे स्थान राईट ट्रॅक अॅथलेटिक्स क्लबच्या भावेश खंडार ४ मि. १५.१५ सेकंद वेळेसह प्राप्त केले. चवथे स्थान फ्युचर अॅथलेटिक्स क्लबच्या हर्ष फायेने व पाचवे स्थान एचटीकेबीएस क्लबच्या विश्वजीत डोंगरेने प्राप्त केले.
चारशे मीटर धावण्यात पुरुष गटात नाह्म्या क्लबच्या सुशील फुलकांबळेने अव्वल स्थान तर द्वितीय स्थान बीकेसीपी अकादमीच्या उदय मस्केने प्राप्त केले. सुशीलने ५५.८८ त४र उदयने ५७.४६ एवढी वेळ नोंदविली. तिसरे स्थान एनएमकेएमच्या पलाश गडवालेने ५७.७२ वेळेसह प्राप्त केले. चवथे स्थान देवदत्त महालेने तर पाचवे स्थान सांगा गजभिये प्राप्त केले. महिला गटात खेलो इंडियाच्या आर्या कोरेने बाजी मारली. आर्याने १ मि. ४.३२ एवढी वेळ देत प्रथम स्थान प्राप्त केले. दुसरे स्थान एचटीकेबीएस हिंगण्याच्या तेजस्विनी सलामने १ मि. १३.९१ सें वेळेसह आणि तिसरे स्थान सीसीडब्ल्यू क्लबच्या सोनाली बावनेने १ मि. २१.५५ सेंकदासह प्राप्त केले. पुरुषांच्या लांब उडीत पहिले तीन स्थान नाह्म्या फाउंडेशनच्या रितीक जामदार, नितीन सुमेध, अमोल धुर्वेने प्राप्त केले. रितीकने ६.२५ मीटर, नितीनने ६.०९ मीटर व अमोलने ५.९२ मीटर एवढी नोंद केली. पुरुष गटात गोळाफेकमध्ये पहिले तीन स्थान बीकेसीपी अकादमीच्या खेळाडूंनी प्राप्त केले. अव्वल स्थान १५.९० मीटरसह मोहित गुप्ताने तर द्वितीय स्थान १३.१२ मीटरसह अभिमन्यू खुशवाहने तिसरे स्थान १२.५६ मीटरसह क्षितीज सिरीयाने प्राप्त केले. तर चवथे स्थान ९.८ मीटरसह क्रडेल स्पोर्टस अकादमीच्या पीयूष मांडेने प्राप्त केले. थाळीफेक पुरुष गटात बीकेसीपीच्या मोहित गुप्ताने प्रथम स्थान तर द्वितीय स्थान याच क्लबच्या अभिमन्यू खुशवाहने आणि तिसरे स्थान क्षितीज सिरीयाने प्राप्त केले. मुलींमध्ये प्रथम स्थान वैशाली सोमकुवरने दुसरे स्थान आश्लेषा इंदुरकरने आणि तिसरे स्थान एनएमकेएमच्या वनिता बिनकरने प्राप्त केले.
स्पर्धेतील विजेत्यांना माजी क्रीडा सभापती नागेश सहारे, सिनेट सदस्य डॉ. संजय चौधरी, माजी आंतरराष्ट्रीय धावपटू सरिता मारबते, प्रशिक्षक राजेश भुते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी, एनडीएएचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक रवींद्र टोंग, जितेंद्र घोरदडेकर, विनोद पाचघरे, अनिल भोरे, अमित ठाकुर आदी उपस्थित होते. संचालन अर्चना कोट्टेवार यांनी तर प्रास्ताविक रामचंद्र वाणी व आभार डॉ. विबेकानंद सिंगने मानले.