नागपुर – भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर विद्यार्थी आघाडी व युवती आघाडी तर्फे प्रसिद्ध उद्योजिका जंयती कठाळे यांचे नागपुरातील युवकांना मार्गदर्शनचा कश्मीर ॲडवांस कॅांफरंस सेंटर येथे आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी पुर्णब्रम्हच्या संचालिका व प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांनी पुर्णब्रम्हची संपुर्ण माहिती सांगितली. आयटी कंपनीतला जॅाब सोडुन पुर्णब्रम्हची कल्पना कशी आली, आपले लोक जेव्हा परदेशात नौकरीस्तव गेल्या नंतर तेथे होणारी जेवणाच्या समस्येला विचारात घेत जयंती यांना पुर्णब्रम्हची सुरवात केली. युवकांनी मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की जेव्हापक्ण आपण कोणत्या व्यवसायाचा विचार करतो तेव्हा त्याचा पुर्ण माहिती मिळवुन त्यावर रिसर्च केली पाहिजे आणि नंतरच व्यवसायाला सुरवात केली पाहिजे. कोणताच व्यवसाय हा ६ महिने अथवा वर्षभरात नफा मिळवत नाही त्यामुळे युवकांनी धीर ठेऊन व्यवसाय करावा. यानंतर यश हे नक्की आपलेच आहे असे त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना नोकरी करणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे असा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी प्रमुख्याने भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमोच्या प्रदेश सदस्य रितेश रहाटे, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, युवती आघाडी संयोजिका डिंपी बजाज, सह-संयोजक गौरव हरडे, सह- संजोयक कामाक्षा रेनके, उत्तर नागपुर युवती प्रमुख राखी मानवटकर, मध्य नागपुर युवती प्रमुख सिमरन नांदुरकर, दक्षिण-पश्चिम नागपुर युवती प्रमुख निधी तेलगोटे, अन्वई सोनाम, रिता गजभिये, अंजु उदासी, सुनिती ताई, आशिष मोहिते,शिवम पंढरीपांडे, पवन महाकाळकर, प्रणित पोचमपल्लीवर,ओम शेरे, तेजस भागवातकर, राहुल सावडिया, गोविंदा अशोक गडगीलवर व सदस्यांनी सहकार्य केले.