भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाचा भरभरून प्रतिसाद

– भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांची माहिती

– अल्पसंख्य समाज विकसित भारतासाठी भरीव योगदान देईल

मुंबई :- मुस्लीम धर्मिय व अन्य अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक लोकांचा मोदी सरकार, महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हायचे आहे. म्हणूनच भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती भाजपा अल्पसंख्याक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक मोर्चा मुंबई अध्यक्ष वासीम खान, सुफी संवाद महाअभियान राष्ट्रीय सह प्रभारी आबीद अली चौधरी, सिकंदर शेख, मुनव्वर शेख, अकील अहमद शेख, भाजपा प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. अल्पसंख्य समाजाचा वापर केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी होण्याचे दिवस भाजपामुळे संपले आहेत. अल्पसंख्य समाजातील नागरिक पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे देश आणि राज्याच्या विकासात भरीव योगदान देतील असा विश्वासही सिद्दिकी यांनी व्यक्त केला.

सिद्दीकी म्हणाले की, आम्ही सर्व अल्पसंख्याक समुदायांशी संवाद साधत या समुदायातील नागरिकांना भाजपा सदस्य बनवत आहोत. भाजपाच्या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून ते भाजपामध्ये सामील झाल्यास आपआपल्या समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग निश्चित करू शकतील हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विकसित भारतासाठी 1 लाख कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी ठेवले असून या फौजेत अल्पसंख्य समाजाचा समावेश असेल. 10 लाख नव्या कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रीय करा, या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचेच फलित म्हणजे सदस्य नोंदणी अभियानादरम्यान उत्तर प्रदेश 6 लाख, मध्य प्रदेश 3 लाख अरुणाचल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये 70 हजार सदस्यांची नोंदणी झाली. मशिदींसमोर, दर्ग्यांसमोर धर्मगुरू पुढाकार घेत सदस्य नोंदणी अभियानात पुढाकार घेतानाचे चित्र आनंददायी असल्याचे ते म्हणाले.

राज्यात अल्पसंख्य समाजातील इद्रिस मुल्तानी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी 1000 हून अधिक सदस्य नोंदणी करून विक्रम केला असून याबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांचा सत्कार करत सन्मानपत्र दिले असल्याचेही सिद्दीकी यांनी नमूद केले. विकसित, आत्मनिर्भर नवभारताच्या जडणघडणीत अल्पसंख्य समाजाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सदस्य अभियानात देशभर 44 लाख मुस्लिम भाजपाचे सदस्य झाले. राज्यात 5 ते 30 जानेवारी दरम्यान 1 लाख मुस्लिम सदस्य झाले, अशी माहिती अल्पसंख्याक मोर्चा मुंबई अध्यक्ष वासीम खान यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ध्वजनिधी संकलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव

Fri Jan 31 , 2025
यवतमाळ :- ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम काम केले आहे. त्यासाठी यापुर्वी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांना मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सैनिक कल्याण संचालकांकडून प्राप्त स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते देखील गौरविण्यात आले. समता मैदानात स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!