समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर :- शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो. मोदीजींचा सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेणारा आणि भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केली.

ते म्हणाले की, मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा अंत्योदयाच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या माणसाची काळजी घेणारा आहे व त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देऊन सक्षम करणारा आहे. मध्यमवर्गीयांच्या आकांक्षाची दखल घेण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि उद्योगांना चालना देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी उपाय करणारा हा अर्थसंकल्प आहे. सप्तर्षी संकल्पनेत मांडल्याप्रमाणे समावेशी विकास, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, युवा शक्तीचा विकास, आर्थिक क्षेत्राचा विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन आगामी पंचवीस वर्षात भारताला विकसित देश बनविण्यासाठी आवश्यक उपाय यात करण्यात आले आहेत.

त्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांनी २०१६ -१७ पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला पैसा हा खर्च समजण्याची अर्थसंकल्पातील तरतूद महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना आयकराच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार क्षेत्राला मदत करणाऱ्या या तरतुदीसाठी आपण केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. प्राथमिक कृषी सोसायट्यांना अधिक सवलती देण्याचा निर्णयही महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंचित घटकांच्या कार्याचा सन्मान करणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

Wed Feb 1 , 2023
नागपूर :- देशातील वंचित घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी मांडला आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली हाताने मैला साफ करण्याची पद्धत बंद करून मशीनद्वारे स्वच्छता कार्य करण्याची संकल्पना मांडून वंचित घटकांच्या कार्याचा सन्मान अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली. देशातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यास शिष्यवृत्तीचे प्रावधान नव्हते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com