भाजपाच दलितांचा सर्वात मोठा रक्षक काँग्रेसपासून सावध रहा – भाजपा खा. ब्रजलाल यांचे आवाहन

मुंबई :- भाजपा संविधान बदलणार आहे, असा खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करत संविधान बदलले. अनेक कायदे करत काँग्रेसनेच दलितांचे सर्वाधिक नुकसान केले. त्यामुळे भाजपा संविधान बदलणार आणि आरक्षण हिसकावणार या काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य ब्रजलाल यांनी शुक्रवारी केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय गिरकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई अध्यक्ष शरद कांबळे उपस्थित होते. संविधानाचे सर्वात मोठे रक्षक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, असेही खा. ब्रज लाल यांनी नमूद केले.

” मी स्वत: दलित आहे ” असे सांगून खा. ब्रज लाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत. पण काँग्रेस आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीसह विरोधी पक्षांनी दलितांना प्रभावित करण्यासाठी संविधान बदलले जाणार, आरक्षण हिसकावले जाईल असा अपप्रचार चालवला आहे. संविधान सदन असे नाव दिलेल्या जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: हातात संविधानाची प्रत घेऊन गेले आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठोपाठ होतो. पण त्यात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सहभागी झाले नव्हते.

संविधानाचे सर्वात मोठे नुकसान कोणी केले असेल तर ते काँग्रेसने केले आहे. प्रशिक्षणाच्या काळात आम्हाला शिकवले जात होते की संविधानात बदल केला जाऊ शकत नाही, मौलिक अधिकार हिसकावले जाऊ शकत नाही. पण आणीबाणी लागू करत काँग्रेसने नागरिकांचे मूलभूत अधिकारही हिसकावले. आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड करत त्यात समाजवादी आणि सेक्युलर हे शब्द घुसवण्याचे काम काँग्रेसनेच केल्याने संविधानाचा आत्मा हरपला. मात्र आता भाजपा संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार करत असल्याचे ही खा. ब्रज लाल यांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरू यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते की आम्हाला आरक्षण नको आहे, याची खा. ब्रज लाल यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, संविधानाने लागू केलेले आरक्षण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय देऊनही अलिगढ विद्यापीठाने आजतागायत दिलेले नाही. काँग्रेसने अलिगढ विद्यापीठासाठी कायदा बदलून दलितांना आरक्षणापासून वंचित ठेवले. अलिगढ विद्यापीठाचे आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे तयार करून दलितांना न्याय दिला. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सीएए) सर्वाधिक फायदा दलितांना झाला. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या आणि तेथे अत्याचार झाल्यानंतर भारतात परतलेल्या दलितांना या कायद्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळाले. इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न मिळाले. पण संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न दिले गेले नाही. 1990 मध्ये भाजपाच्या पाठींब्याने व्ही.पी. सिंह सरकारने डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

खा. ब्रज लाल यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईसह देशभरात शेकडो ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यामागे कुणाचा हात आहे हे माहीत असतानाही काँग्रेसने भगवा दहशतवाद असल्याचे चित्र निर्माण केले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळलेल्यांनाही कायम संरक्षण देण्याचेच काम काँग्रेसने केले. 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या आधी मुंबईतील गोरेगाव येथील लष्कर – ए – तोयबाचा कमांडर फाईम अन्सारी याला आम्ही पकडले असता त्याच्याकडे मुंबई हल्ल्यासाठीचा नकाशा सापडला होता. ते आम्ही मुंबई पोलिसांना कळवले. त्यांनी त्यावेळी दक्षता घेतली असती तर हल्ला रोखता आला असता पण काँग्रेस सरकारने काही केले नाही. उलट हुतात्मा पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूला भगवा दहशतवाद कारणीभूत असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केल्याचा आरोप ब्रज लाल यांनी केला. असाच अपप्रचार करणारे तेव्हाचे एक कॅबिनेट मंत्री नंतर दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेले. काँग्रेसच्या या गोबेल्स नितीपासून सर्वांनीच सावध राहणे आवश्यक असल्याचे ब्रज लाल यांनी सांगितले.

मुंबईत आल्यावर खा. ब्रज लाल यांनी चैत्यभूमीला भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणतांना वाळवून आणावा - जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया

Fri Oct 25 , 2024
– सोयाबिन खरेदीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा यवतमाळ :- यवतमाळ हा कापुस व सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. या हंगामाकरीता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ४ हजार ८९२ आणि कापसासाठी प्रति क्विंटल ७ हजार २० असे हमीभाव घोषित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील सोयाबीन या शेतपिकाची आवक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणतांना वाळवून आणावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सोयाबीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!