नागपूर :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची मानल्या जाते. भाजपचा गड मानल्या जात असलेल्या नागपुरात पक्षाचा पाठिंबा कोणाला मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच यंदा मात्र संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची तारिख आली असताना भाजपाने अद्याप कोणत्याच उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला नाही.
– नागो गाणार म्हणाले
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने आजपर्यंत कधीच अधिकृत उमेदवार उभा केला नाही, परंतु, प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्याच उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. निवडून आणले आहे. त्यामुळे याबाबत कुठला पेच निर्माण झाला, असे समजण्याचे कारण नाही असे आमदार नागो गाणार म्हणाले.
-शिक्षणक्षेत्रात काम करणारी स्वतंत्र संस्ठा
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची कार्यपद्धती भारतीय जनता पक्षाची आहे आणि ती पद्धती ते पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद हे वेगवेगळे युनिट आहेत. भाजप हा राजकीय पक्ष आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ही शिक्षणक्षेत्रात काम करणारी स्वतंत्र संस्ठा आहे. परिषद आपला उमेदवार जाहीर करते आणि भाजपला पाठिंबा देण्याची विनंती करते. भाजपसुद्दा या विनंतीला मान देऊन पाठिंबा देते, असेही नागो गाणार म्हणाले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.