पारशिवनी खरेदी विक्री संस्थेवर भाजपने राखला गड..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

संचालक मंडळाकरीता पार पडली निवडणुक भाजपचे नऊ उमेदवार विजयी..

पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील खरेदी विक्री संघाचा आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत भारतीय शेतकरी विकास आघाडीचे नऊ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीचा निकालही आज सायंकाळी जाहीर करण्यात आला.

आज सकाळ पासुनच खरेदी विक्री संघाचा निवडणुकीला सुरूवात झालेली होती. व आजच सायंकाळी 5.30 वाजता या निवडणुकीचा निकालही जाहीर करण्यात आला. यामध्ये काॅग्रेस समर्थीत शेतकरी सहकार पॅनलचा सर्व साधारण मतदार संघातून चंद्रशेखर उपासे यांना ( 171 मते ) , रविंद्र काढे ( 160 मते ) , राहुल पहाडे ( 169 मते ) , विरव्यंकटराव वाकलपुडी ( 169 मते ) , भगवान वांढे ( 179 मते ) तर भाजपा समर्थीत भारतीय शेतकरी विकास आघाडीचा सर्व साधारण मतदार संघातील राजेश कडु यांना ( 353 मते ) , नेताजी खळतकर ( 352 मते ) , सुरेश भगत ( 347 मते ) , उत्तम सायरे ( 344 मते ) , दिलीप वाळके ( 367 मते ) मिळाली. तसेच महिला राखीव गटातून शेतकरी सहकार पॅनलच्या वंदना चकोले यांना ( 171 ) तर अपक्ष वेणुबाई बढे यांना ( 19 मते ) , भाजपा समर्थीत भारतीय शेतकरी विकास आघाडीचा विमल जगनाडे यांना ( 376 मते ) , छाया येरखेडे ( 344 मते ) मिळाली. इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी सहकार पॅनलचा गोविंद कापसे यांना ( 183 मते ) तर भारतीय शेतकरी विकास आघाडीच्या चंद्रभान इंगोले यांना ( 355 मते ) मिळाली. त्याचप्रमाणे शेतकरी सहकार पॅनलचे भटक्या जाती / विमुक्त जमाती गटातील माणीकचंद अमृते यांना ( 176 मते ) तर कंचन गिरी यांना ( 373 मते ) मिळाली. यात भाजप समर्थीत भारतीय शेतकरी विकास आघाडीचे नऊ ही उमेदवार विजयी झाले. याआधीच काॅग्रेसचे सेवा सहकारी गटाचे आनंदराव काकडे , पुरूषोत्तम जवंजाळ , उमाजी बुरडे , शेषराव भलावी , रेवा भुजाडे विजयी झाले होते . भाजपचे अरुण लांजेवार अविरोध निवडुन आले होते.

या निवडणुकीचा विजया करीता आमदार आशिष जयस्वाल , माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी , जिल्हा नियोजन समीती सदस्य सुधाकर मेंघर , माजी समाजकल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे , प्रकाश वांढे ,  अतुल हजारे , रामभाऊ दिवटे , शंकर चहांदे , डाॅ. प्रमोद भड , ओमप्रकाश पालीवाल , परसराम राऊत , जयराम मेहरकुळे , विजय उपासे , सुधीर कापसे , रमेश चकोले , राजेश गोमकाळे ,  जयदेव धुंडे , शंकर मेंघर , आशिष भुरसे , गुणेश घेर , बंडू ठाकरे , मनोज गिरी , सोनल वैद्य ,  तुळशीराम मेंघर , रेखा दुनेदार , राजेंद्र भांडवलकर , कृष्णा चिखले , संजय जगनाडे , पवन बोंदरे , यांनी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षाआधी खरेदी विक्री संघाला राज्य शासनाचा उदासीन धोरणामुळे उतरती कळा लागलेली होती. मात्र जेव्हापासुन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पद सुरेश भगत यांनी सांभाळले तेव्हापासून खरेदी विक्री खऱ्या अर्थाने नावारुपास आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मोफत श्वानदंश रोग प्रतीबंधक लसीकरणाला पशुपालकांचा उत्स्फुर्त प्रतीसाद

Sun May 21 , 2023
नागपूर :- जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर व्दारा पशुसंवर्धक विभागाच्या 131 व्या स्पापना दिनानिमित्त आयोजित मोफत श्वानदंश रोग प्रतीबंधक लसीकरण या नाविण्यपूर्ण कार्यक्रमाला पशुपालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसरामध्ये आज सकाळी आयोजित श्वानवदंश रोग प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, यांचे हस्ते डॉ. युवराज केने, सहाय्यक आयुक्त पशुसर्वधन ,जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com