संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी नगर परिषद मुख्याधिकारी ला सामूहिक निवेदन सादर
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील कित्येक भागात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून बहुतेक ठिकाणी नाली सफाई न झाल्यामुळे व साचलेल्या सांडपाणी व वाहत्या पाण्यामुळे डासांचा प्रकोप वाढत आहे.त्यामुळे शहरात साथ रोगाची लागण होत असून बहुतेक नागरिक मलेरिया, टायफाईड सह डेंग्यूग्रस्त आजाराने ग्रस्त होत आहेत तेव्हा या रोगाला बळी पडून कुणाची जीवितहानी न व्हावी व आरोग्यास धोका निर्माण न व्हावा यासाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने गंभीर्याची भूमिका घेत शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत धूळ फवारणी, ब्लिचिंग पावडर ,किटनाशल औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी मुख्यधिकारी संदीप बोरकर ला दिलेल्या सामूहिक निवेदनातुन करण्यात आले.
निवेदन देताना माजी नगरसेवक प्रतीक पडोळे, माजी नगरसेवक कपिल गायधने, लाला खंडेलवाल, अतुल हजारे, गौतम माटे,अल्पेश भवते, सागर राघोर्ते, पवन लांडगे,जितेंद्र लांजेवार आदी उपस्थित होते.