भाजपा द्वारे सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियान थाटात संपन्न

 भाजपा नेत्यांनी नागरिकांना विविध योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे केले आवाहन. 
 
कन्हान : – केंद्रातील मोदी सरकार ला ८ वर्ष पुर्ण केल्याने कन्हान येथे भाजपा द्वारे संपुर्ण परिसरात सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियान अंतर्गत नागरिकांना मोदी सरकार च्या विविध जन कल्याणकारी योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे व शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी नागरिकांना केले.
         केंद्रातील मोदीं सरकार च्या नेतृत्वातील भाजपा सरकार ला ८ वर्षे पुर्ण झाल्याने सेवा, सुशासन व गरी ब कल्याण पंधरवाडा अभियाना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करून जनकल्याणकारी आठ वर्षाच्या का ळात केंद्राच्या वतीने लागु करण्यात आलेल्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती देण्याकरीता सोमवार (दि.६) जुन ला सिहोरा येथे राजेंद्र मोरे यांच्या निवसास्थानी नागरिकांना मोदी सरकार च्या गरीब कल्याण योजनेची माहिती व शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात होते. मंगळवार (दि.७) जुन ला युवा संवाद सभेचे आयोजन शिवाजी नगर येथे कर ण्यात आले असुन बुधवार (दि.८) जुन ला महिला संवाद सभेचे आयोजन राजीव गांधी बालोद्यान पाणी टंकी परिसर हनुमान कन्हान येथे करण्यात आले होते. गुरुवार (दि.९) जुन ला ओबीसी संवाद सभेचे आयोज न हिराबाई कन्या विद्यालय स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे करण्यात आले. शुक्रवार (दि.१०) जुन ला अनुसुचित जाती मोर्चा संवाद सभेचे आयोजन सुंदर बाई गजभिये ले आऊट नाका नंबर सात सरोज विश्व  कर्मा यांचा घराजवळ करण्यात आले असुन शनिवार (दि.११) जुन ला अनुसूचित जमाती मोर्चा संवाद सभे चे आयोजन रायनगर येथे करण्यात आले होते. याप्र संगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी केंद्र सरकार च्या जनधन योजन, आयुष्मान यो जना, ई श्रम कार्ड योजना, हेल्थ कार्ड योजन, किसान सम्मान निधी योजना, शेतकरी पेंशन योजना, अटल पेंशन योजना, शेतकरी कुसुम योजना, पिकविमा योजना, माती परिक्षण योजना, स्वनिधी योजना, बेटी बचाव, बेटी पढाव योजना, सुकन्या योजना, वयोश्री योजना, मातृत्व वंदना योजना, अपघात विमा योजना, पिग्रम वाणी योजना, मोफत शिलाई मशीन योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना सह विविध योजनांची माहिती उपस्थितांना देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले असुन भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासात्मक कामाची माहिती देशा त सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण करणे, आतंकवाद व दहशद वादावर नियंत्रण करणे, खेलो इंडिया योजने अंतर्गत खेळाडुंना प्रोत्साहन करणे, मुस्लीम महिलां करीता तीन तलाक कायदा निर्माण करणे, ३७० कलम हटविने, अयोध्येत राममंदिर निर्माण करणे, आत्मनिभ र भारत योजने अंतर्गत कोरोना लसीकरण करणे, अन्न सुरक्षा योजना, अंतोदय योजना तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नेतृत्व प्रतिमा उंचावण्याकरीता केले ल्या विविध प्रयत्नांची माहिती, नविन शैक्षणिक धोरणा ची माहिती सह विविध माहिती उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन भा जपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी यां नी मानले. याप्रसंगी भाजप माजी आमदार डी मल्लि कार्जुन रेडडी, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, रिंकेश चवरे, माधव वैद्य, अमोल साकोरे, राजेश गणोरकर, विक्की सोलंकी, कामेश्वर शर्मा, रंजीत शिंदे कर, अजय लोंढे, मयुर माटे, ऋृषभ बावनकर, शैलेश शेळके, भरत साळवे, मुलचंद शिंदे कर, लिलाधर बर्वे , राजुभाऊ पाटील, नथ्थुजी चरडे, विनोद कोहळे,  स्वाती पाठक, सौ राखी परते, लक्ष्मी लाडेकर, सुनंदा दिवटे, बबली बिलोने, समर्थना देशभ्र तार, मिना कळं बे, सुषमा मस्के, वर्षा लोंढे, अनिता साकोरे, चंद्रगुप्ता पानतावणे, तुळजाबाई रामटेके, समिक्षा पाली, पौर्णि मा दुबे, जिजाबाई सोनुले, प्रतिक्षा चवरे, आकांशा वैकाडे, निशा ऊके, शालीनी बर्वे, सुनंदा बावने, गीता कळंबे, वनिता कात्यानी, राजु श्रीवास्तव, बबलु कमा ले, चंद्रहास पुरे, दिपनकर गजभिये, रवी महाकाळकर, विमोद किरपान, पंचम सलामे, आकाश वाढणकर, नारायण गजभिये, सौरभ पोटभरे, अविराम कनोजिया, आकाश कापसे सह भाजपा पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस रोगनिदान व रक्तदान शिबीराने युवासेने व्दारे साजरा

Tue Jun 14 , 2022
कन्हान : –  युवासेना प्रमुख पर्यटन पर्यावरण व राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढ दिवसी युवासेना व्दारे कन्हान ला रोगनिदान व रक्तदा न शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला.        कन्हान-पिपरी नविन नगरपरिषद भवन येथे सोम वार (दि.१३) जुन ला युवासेना प्रमुख पर्यटन, पर्यावर ण व राज शिष्टाचार मंत्री आदित्य  ठाकरे यांच्या वाढदिवसी युवासेना कन्हान व्दारे रोगनिदान व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com