प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर :- दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तरोडी बुजुर्ग येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली

याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित श्री गजानन शिक्षण सेवा संस्थेच्या अध्यक्षा अवंतिका लेकुरवाळे (सभापती महिला व बालकल्याण जि. प नागपूर) व रमेश लेकुरवाळे ( सचिव श्री. गजानन शिक्षण सेवा संस्था) व प्राचार्य नंदा ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रपती महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजीच्या प्रतिमेस पूजन करून माल्यापर्ण करण्यात आले.

याप्रसंगी रॅलीचे आयोजन करून गावातून फेरी काढण्यात आली फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश सत्य अहिंसा प्रेम देशभक्तीचे संदेश देणारे होर्डिंग हातात घेऊन भारत माता की जय महात्मा गांधी की जय लालबहादूर शास्त्री जी की जय जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी एक तास श्रमदान करण्यात आले व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजींची जीवन प्रणाली विद्यार्थ्यांसमोर उभी केली.

याप्रसंगी अवंतिका लेकुरवाळे व रमेश लेकुरवाडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जीवनातील मार्गदर्शन तत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांनी ती अंगीकारावी ही अपेक्षाही व्यक्त केली तसेच कार्यक्रमाचे संचालन मोहित बोरकर, जेनिया गजभिये व ललिता तांडी या विद्यार्थ्यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सांची तेथे या विद्यार्थिनीने केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करून जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

Thu Oct 5 , 2023
काटोल :- दिनांक ०६/१०/२०२१ चे १६.३२ वा. दरम्यान फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. काटोल येथे अप. ५१६ / २०२१ कलम ३०२, ३५४, ३५४(१), ३७६ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक ०५/१०/२०२१ से १६.०० वा. ते १६.३० वा. दरम्यान यातील आरोपी अमलेशकुमार शंभु मंडल, वय १८ वर्ष, रा. गडीराधे नगर जि. सुफाल बिहार ह. मु. सावरगाव रोड काटोल याने मृतक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!