संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बहिणींना गोडभेट म्हणून महायुती शासनाने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना अंमलात आणली.आणि ती योजना जाहिर होताच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची झुंबड उडत असताना कामठी नगर पालिकेची जन्म मृत्यू नोंद 1 जुलै पासून अतिशय संथगतीने सुरू होती तर बऱ्याच दिवसापासून ही वेबसाईट बंद असल्याप्रकारची तांत्रिक अडचण असल्याने कामठी नगर परिषद मध्ये जन्म मृत्यू दाखला विभागात आवश्यक कामासाठी येणाऱ्या महिला तसेच ज्यांना जन्म मृत्यू दाखले पाहिजे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तर मागील एक महिन्यापासून मृत्यू दाखला मिळत नसल्याची शोकांतिका आहे.
शासनाने जन्म मृत्यू दाखल्यासाठी सुरू केलेली www.dc.com of india ही नवीन अद्यावत वेबसाईट ही 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली मात्र यामध्ये जन्म मृत्युच्या नोंदी करताना नोंदी अडकणे,21 दिवसाच्या आत नोंद असल्यास ती घेणे नाही तर जुन्या पुराव्यांची माहिती कागदपत्रे अपलोड करणे यासह आदी तांत्रिक अडचणी या वेबसाईट मध्ये येत असल्याने दिवभरात 35 च्या जवळपास जन्म मृत्यूदाखल्याचे अर्ज येतात मात्र या तांत्रिक अडचणीमुळे दिवसभरात फक्त 3 दाखले निघत होते मात्र आता वेबसाईट बंद असल्याने दाखल्याची संख्या ही निरंक आहे. वास्तविकता नगर परिषद हद्दीत असलेल्यानी जन्माची व मृत्यूची नोंद नगर परिषद मध्येच करावी लागते मात्र आता मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आल्याने महिलांना सुद्धा जन्म तारखेच्या दाखल्याची आवश्यकता भासत आहे तसेच अनेकांना शैक्षणिक कामासाठी जन्म तारखेच्या दाखल्याची व काहींना मृत्यूच्या दाखल्याची गरज पडत असल्याने दररोज कामठी नगरपरिषद च्या जन्म मृत्यू विभागाकडे नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र 1 जुलै पासून सुरू झालेल्या या नविन वेबसाईट मूळे अनेक तांत्रिक अडचणी व समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना जन्म मृत्यू दाखले मिळविताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे.