नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदे दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉ यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.
14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे साठी सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी, व्यापार आणि आर्थिक क्षेत्र; नागरी विमान वाहतूक, नवीकरणीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण क्षेत्रातील सह-उत्पादन आणि उत्पादन, तसेच नागरी आण्विक सहकार्य, यासारख्या विविध क्षेत्रांमधील आपल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि यामधील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. नवीन क्षेत्रांमधील भागीदारी वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी फ्रान्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक घडामोडी आणि आव्हानांबाबतच्या विचारांचे आदान-प्रदान केले.