काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड

अमरावती :- अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आता अध्यक्षपदी निवड झालीय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चांगलीच फिल्डिंग लावली होती. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्ष पदासाठी अभिजीत ढेपे यांनी अर्ज भरला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार फील्डिंग लावल्याची माहिती मिळत होती. अखेर या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी निवड झालीय.

‘हा दडपशाहीच्या विरोधातला विजय’

बच्चू कडू यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिलीय. “हा दडपशाहीच्या विरोधातला विजय आहे. शेतकऱ्यांना या बँकेतून कर्ज मिळावं यासाठी उपोषण करावं लागलं. त्याचा हा बदला निघाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला वाईट वागणूक दिल्याने त्याचे परिणाम काय भेटतात याचा रिझल्ट आहे. आम्ही कडू जरी असलो तरी गोड बोलतो हे या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा जम्मू प्रणेता ठरणार

Mon Jul 24 , 2023
– जम्मूमधील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा अफू संशोधन प्रकल्प हा कॅनडाच्या कंपनीसह भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे, ज्यात घातक पदार्थापासून मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त घटक बनवण्याची मोठी क्षमता आहे: डॉ जितेंद्र सिंह मुंबई :- भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा जम्मू प्रणेता ठरणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com