संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सर्वांना शांती अहिंसेचा मार्ग देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्धांचा मार्ग हा जगात शांतता नांदवणारा आहे तसेच दुःख,भय ,भीती व रोगमुक्तीसाठी तथागताचा धम्म हा मानव कल्याणकारी एकमेव मार्ग असल्याचे मौलिक मत नागसेन बुद्ध विहार चे अध्यक्ष महादेव गणवीर यांनी नागसेन नगर स्थित नागसेन बुद्ध विहाराच्या पुनर्बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
नागसेन बुद्ध विहार मागील साथ वर्षांपूर्वी पासून स्थापित असून दररोज या विहारात बुद्ध वंदना घेण्यात येते मात्र या विहाराची झालेली जीर्णावस्था लक्षात घेत येथील अनुयायांनी शासनाच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता तसेच कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींच्या मदतीची अपेक्षा न ठेवता वस्तीतीलच लोकवर्गणीतून अंदाजे 5 लक्ष रुपयाच्या लोकवर्गणीतून नागसेन बुद्ध विहाराचे पुनर्बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले यावर सर्वानी सहमती दर्शवित जमा झालेंल्या वर्गणीतून या विहाराच्या बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात विशेष बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.
याप्रसंगी विहार कमिटी चे अध्यक्ष महादेव गणवीर, सचिव राजन मेश्राम, काता मेश्राम, सत्यफुला खांडेकर, कुंदा कडबे, मालन कांबळे, मनमित मेश्राम, सोपान खोब्रागडे, अक्षय गजभिये, गुलाबराव रामटेके, प्रतीक गजभिये, संघर्षशील मेश्राम ,राजू बोरकर, आशिष मेश्राम यासह परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते