राष्ट्रीय महामार्ग पावडदौना रोड ते परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पर्यंत प्रस्तावित सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ;- महाराष्ट्र शासन बांधकाम विभाग, जिल्हा नागपूर अंतर्गत मौदा-कामठी विधानसभा आमदार टेकचंद सावरकर यांच्या जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग पावडदौना रोड ते परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पर्यंत १ कोटी रूपये किमतीच्या सिमेंट रस्त्याचे भमिपूजन आज प.पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजु मदनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, मंडळाचे उपाध्यक्ष, मनोहर देशमुख सहसचिव, मोरेश्वर गभने कोषाध्यक्ष, प्रवीण उराडे तसेच टिकाराम भेंडारकर संचालक, मौदा आश्रम चे व्यवस्थापक.पांडुरंग शेंडे ,सेवकगण सागर राजु मदनकर व ग्रामपंचायत पावडदौना चे सरपंच सतीश भोयर इतर तसेच सेवक सेविका उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com