नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती 

नागपूर :- नागपूर शहराच्या मध्य भागातील नाईक तलाव आणि लेंडी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्याचे शुक्रवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

नाईक तलाव परिसरात झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार प्रवीण दटके, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, माजी नगरसेविका वंदना यंगटवार, माजी नगरसेवक राजेश घोडपागे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे नाईक तलाव आणि लेंडी तलावामध्ये असलेली घाण स्वच्छ करून तलावाचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तलावात स्वच्छ पाणी राहील, तलावाचे सौंदर्यीकरण होईल, नागरिकांना फिरायला जागा निर्माण होईल. मात्र हे सर्व करताना तलावात घाण जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी येथील रहिवासी जनतेची आहे. तलावात अतिक्रमण आणि घाण होणार नाही, याची नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन यावेळी ना. गडकरी यांनी केले. तलावाचे सौंदर्यीकरण ठेवण्याची नागरिकांनी जबाबदारी स्वीकारल्यास या ठिकाणी फ्लोटिंग बोट ची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गतवैभव प्राप्त असलेल्या नाईक आणि लेंडी तलावांचे पुनरुज्जीवन हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी अमृतकाळात आणलेल्या अमृत योजने अंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दोन्ही तलावांचे पुनरुज्जीवन होणार असून या कार्यासाठी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आमदार प्रवीण दटके यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रति आनंद व्यक्त करीत स्थानिक नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्यांनी या भागात उड्डाण पूल आणि विद्युत खांबांच्या विषयाकडे लक्ष वेधले.

आमदार विकास कुंभारे यांनी दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवन कार्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्याबद्दल मध्य नागपूरच्या जनतेच्या वतीने नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी प्रास्ताविकामध्ये नाईक तलाव व लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी मानले.

नाईक तलाव पुनरूज्जीवन प्रकल्प

नाईक तलाव नागपूर शहरातील मध्य भागात असून तलावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३.० हेक्टर आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शासनाने नाईक तलाव पुनरुज्जीवन या १२.९५ कोटीच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग मंत्रालयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा रु. ३.२४ कोटी (२५ टक्के), राज्य शासनाचा हिस्सा रु. ३.२४ कोटी (२५ टक्के) व मनपाचा हिस्सा रु. ६.४८ कोटी (५० टक्के) आहे.

नाईक तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पात मुख्यत्वे खालील कामांचा समावेश आहे.

१) तलावातील गाळ काढणे,

२) पादचारी मार्ग (520 मीटर लांब / 2.5 मीटर रूंद)

३) पावसाळी नाली टाकणे (550 मी. लांब)

४) तलाव किनार भिंत (Edge Wall) (735Rmt / 4M width)

५) मलवाहिनी टाकणे (450Rmt)

६) योगा शेड व विसर्जन टँक

नाईक तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पामध्ये तलावातील गाळ काढल्याने अंदाजे ६४,००० Cum अतिरिक्त जलसंचय तलावात होणार आहे.

लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प

लेंडी तलाव नागपूर शहरातील मध्य भागात असून तलावाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे २.६ हेक्टर आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शासनाने लेंडी तलाव पुनरुज्जीवन या रु. १४.१३ कोटीच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग मंत्रालयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा रु. ३.५३ कोटी (२५ टक्के), राज्य शासनाचा हिस्सा रु. ३.५३ कोटी (२५ टक्के) व मनपाचा हिस्सा रु. ७.०७ कोटी (५० टक्के) आहे.

लेंडी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पात मुख्यत्वे खालील कामांचा समावेश आहे.

१) तलावातील गाळ काढणे

३) पावसाळी नाली टाकणे (600 मी. लांब)

५) तलाव किनार भिंत (Edge Wall)

२) पादचारी मार्ग (610 मी. लांब / 3 मी. रुंद)

४) मलवाहिनी टाकणे (800 मी.)

६) विसर्जन टँक

लेंडी तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पामध्ये तलावातील गाळ काढल्याने अंदाजे ४५,००० Cum अतिरिक्त जलसंचय तलावात होणार आहे.

लेंडी तलावात अतिक्रमण असून सदरहु तलाव नझुल अंतर्गत येतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परमपूज्य डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांची जयंती सम्पन्न 

Sat Apr 15 , 2023
नागपूर :- सिद्धार्थ बौद्ध विहार जूनी मंगळवारी गंगाबाई घाट या ठिकाणी परमपूज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्य समाजसेवक विनोद इंगोले यांच्या हस्ते माल्यार्पण करून महाप्रसादचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे उपाध्यक्ष चंदू वाकोडकर तसेच नागेश मेश्राम राजेन्द्र बोरकर सुनीता मेश्राम मधुर बागड़े सुजाता लांडगे बबिता खांडेकर कविता खोबरागड़े रंजना खांडेकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com