संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज परीसराचे विस्तारीकरण व सौंदर्यकरण व्हावे याकरीता मागील तीन वर्षे पासुन युवा चेतना मंच कामठी तर्फे सतत पाठपुरावा करण्यात येते होते , विविध प्रकारचे शासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम कार्यालया, अभियंता , राजकीय पदाधिकारी यांच्या पाठपुरावा करून युवा चेतना मंच ला कामठी मौदा विधासभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या निधीतून १५ लक्ष रूपये मंजुर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या कामाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, सुनील खानवानी कामठी शहर महामंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रंसगी प्रामुख्याने श्रीनिवास वियनवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह मुकेश चकोले , ग्रीनर प्रोजेक्ट चे संचालक सचिन नायडू , युवा चेतना मंच चे शिव उत्सव प्रमुख मयूर गुरव ,शिव उत्सव सहप्रमुख कुणाल सोलंकी, बाँबी महेंद्र, अनिल गंडाईत , आकाश भोगे , हितेश बावनकुळे , श्रीकांत मुरमारे, बंटी पिल्ले, चंदन वर्णम ,अक्षय खोपे, युवा चेतना मंच , शिव नित्य पुजन , हिंदू जागरण मंच चे समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजन व सुत्रंसचालन प्रा पराग सपाटे यांनी केले.