नागपूर :- विराम गोपाळराव चंडीमेश्राम, वय ५२ वर्ष रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी नामे भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष, रा. आसोली यांच्यामध्ये वादविवाद झाला त्यावरून फिर्यादीचा भाऊ जखमी हा आसोली टाटा जायका मोटर्स चाय टपरी जवळ उभी असता आरोपी हा तेथे येवून हातात टिकाशीचा दांडा घेवून आला व फिर्यादीचा भाऊ बबन गोपाळराव मंडीमेश्राम याच्या डोक्यावर मारून याला गंभीर जखमी केले व जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबाबत पोस्टे मौदा येथे अप. क्र. ७८०/२०२३ कलम ३०७, ३०२ भा. द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दि. ०३/०९/२०२३ रोजी पो.स्टे. मौदा अप. क्र. ७८० / २०२३ कलम ३०७, ३०२ भा.द.वी. गुन्हातील आरोपी भगवे कपडे घातलेला व सायकलने फिरणारा एवढीच त्याची ओळख असताना व तो घटनेनंतर नागपूरच्या दिशेने गेला असल्याची माहिती मिळाल्याने घटना तारीख २९/०८/२०२३ चे १३.०० वाजेपासून घटनास्थळ ते नागपूर हद्दीत सदर इसमाचा शोध घेत असताना, घटनास्थळापासून ते नागपूर परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले व बातमीदार यांचे कडून माहीती घेत असता, बातमीदारांकडून माहिती मिळाली की सदर इसम भगवे कपडे परिधान करणारा व सायकलने जाणारा इसम हा रेशीम बागकडे दिसून आला आहे. अशा माहिती वरून सदरची माहिती लागलीच वरिष्ठांना देवून, स्टाफसह मिळालेल्या माहिती प्रमाणे गेले असता सदर इसम हा सम्राट अशोक चौक नागपूरकडे जाताना दिसून आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यास गुन्हाबाबत विचारपूस केली असता त्यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिले व तो मनोविकृत असल्याचे भासवू लागला. आरोपीस प्रेमाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने घटना तारखेला आसोली शिवारातील नाग नदी जवळ गुन्हयातील पीडित मृतक याने त्यास अगोदर मारहाण केल्याने त्याने दांड्याने मारहाण केल्याचे सांगितले व घटने तारखेपासून तो नाग नदी येथील त्याचे झोपडी मध्ये आले नसल्याचे सांगितले. त्याचे नावाबाबत भंडारा येथील मांडवी गावातील स्थानिक तसेच भंडारा पोलिस यांचे कडून खात्री केली असता, त्याचे नाव दिगंबर इस्तारी मेश्राम (महाराज) रा. मांडवी ता. जिल्हा भंडारा असल्याचे समजले. तसेच सदर आरोपीच्या हातावर करीम खान असे नाव गोंदलेले दिसून आले. सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोदार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस नायक संजय बरोदिया, मुकेश शुक्ला यांनी पार पाडली.