नागपुर :-भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे विद्यार्थी विभागाने आज ‘ब्रंच ओवर बजेट’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. बजेट आल्यानंतर महाविद्यालयातील सामान्य विद्यार्थ्यांना बजेटबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा व बजेट समजावे या दृष्टीकोनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमामध्ये जवळपास १२ कॅालेजेसच्या प्रतिनीधीं बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विष्णु चांगदे यांनी यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. त्यानंतर कॅालेजेसच्या प्रतिनीधी यांनी एक-एक करून सादरीकरणाद्वारे बजेटबद्दल माहीती व थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला.
मोदींचे बजेट हे सर्वासामान्यांसाठी तयार केलेले आहे. अगोदर २०१४ पुर्वी बजेट हे केवळ श्रिमंतांचा किंव्हा विशिष्ठ वर्गासाठी सिमीत वर्गासाठी होता. पण आता २०१४ नंतर मोदी सरकार आली तेव्हा पासुन हा बजेट लोकतांत्रिक विषय झाला आहे व प्रत्येकांचा विषय झालेला आहे.
जर का सर्व सामान्य लोकांनी नेमके मोदी सरकार काय करत आहे हे सर्वसामान्य लोकांना कळावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश किती प्रगती करतो आहे हे लोकांना कळावे. आपण अगोदर १०व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो ती आज ५व्या क्रमांकावर आली आहे. हा सर्व प्रवास सामान्य जनतेपर्यंत पोहचावा, बजेट काय असते? कसे असते? बजेट हे सर्वसामान्य व्यक्ती सोबत कसे निगडीत आहे ह्या करीता हा आजचा उपक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाकरीता विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि भविष्यात भारतीय रिझर्व बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी जेव्हा होईल तेव्हा देखील असाच हा कार्यक्रम घेण्याचा उद्दैश आहे. देशात अश्या प्रकारचा विद्यार्थ्यांना घेऊन असलेला बजेटवरचा पहिला कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेशराहाटे, भाजयुमो प्रसिद्घी प्रमुख प्रसाद मुजुमदार, अक्षय ठवकर, अनिकेत ढोले, अक्षय दाणी व गौरव टांगसाळे उपस्थित होते.