नागपूर – प्रवासी बसेस करीता निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे सद्य स्थितीत आकरले जात आहे तसेच ओला टु-विल्हर संदर्भात रितसर परवानगी देऊन ही सेवा संपुर्णपणे शहरात सुरू करावी या करीता हे निवेदन देण्यात आले.
भाजयुमो निवेदनात म्हणाले की प्रवासी बसेस करीता निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे सद्य स्थितीत आकरले जात आहे. विदर्भातील भुमीपुत्र मुंबई, पुणे सारख्या शहरात शिक्षण व नौकरी करीता आपल्या परीवारापासुन दुर जातात व दर सणा-सुदीच्या दिवसात सुट्टी म्हणुन आपल्या भुमीपुत्रांना घरी परत येतांना त्याचा मोठा मोबदला चुकवावा लागतो.
प्रत्येक वर्षाला दिवाळी दसरा व इतर सणाला शहरातील खाजगी बस संचालक ह्या भुमीपुत्राकडुन मनमानी पैसा उकळतात पण बस संचालक समुहाच्या समोर हतबल असलेला आमचा शिक्षीत भुमीपुत्र काहीच करु शकत नाही. कारण शिक्षण आणि खाजगी नौकरी करणाऱ्या आमच्या भुमीपुत्रांना त्यांचा विरोध करणे ही परवडत नाही पण आता भाजयुमो यापुढे हे सहन करून घेणार नाही असे अवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) यांना केले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहेत. सर्व खाजगी बस वाहतूकदारांनी आपली खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहीत नमुन्यात तक्ता तयार करून व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी बस वाहतूकदारांच्या बुकिंग कार्यालयाच्या बाहेरील दर्शनी भागी प्रवाशांना सहजपणे दिसेल अशाप्रकारे प्रसिध्द करावा आणि प्रवाश्यांकडून शासन निर्णयाप्रमाणे भाडे आकारावे असा नियम असतांना देखील याला पळतांना खाजगी बस वाहतूकदार दिसत नाही आहेत. भाजयुमोने निवेदनाद्वारे निवेदन केले की या विषयावर आर.टी.ओ नी एक फ्लाईंग स्कॅाड तयार करून संबधित खाजगी बस वाहतूकदारांवर कारवाही करावी, यावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) यांनी भाजयुमोला विनंती केली की अश्या प्रकारच्या कोणत्या तक्रारी असतील तर त्या लेखी स्वरूपात प्रादेशिक परिवहन कार्यलयात द्याव्या जेणे करून आम्ही त्यावर कारवाही करू.
तसेच काही दिवसांच्या अगोदर नागपुर शहरात सुरू झालेल्या ओला टुव्हिलर शेअरींग संदर्भात आपण कारवाही करून ही सेवा बंद केली. या सेवेच्या माध्यमातुन अनेक तरुणांना रोजगार मिळत होता. आपण संबधित कंपनीला कायद्याच्या अंतर्गत रितसर परवानगी देऊन ही सेवा शहरात सूरू करावी जेणेकरून अनेक तरूणांना रोजगार म्हणुन याची मदत होईल असे भाजयुमोने निवेदनात नमुद केले. त्यावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) यांनी असे सांगितले की संबधित विषय हा पोलीसी संदर्भात आहे. एकदा शासनामार्फेत यावर पोलीसी तयार झाली की आपण रितसर परवानगी देऊन ही सेवा शहरात सूरू करू.
वरील दोन्ही ही विषयांवर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर) सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवीनी दाणी उपस्थित होत्या. निवेदन भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात देण्यात आले. सोबत भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, अनुसुचित मोर्चा अध्यक्ष राजेश हातीबेड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, अनुसुचित मोर्चा महामंत्री योगेश पाचपौर, बबलु बक्सारीया, भाजयुमो मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, निलेश राऊत, बादल राऊत, पंकज सोनकर, संपर्क प्रमुख सचिन सावरकर, आषिश चिटणवीस, मंगेश गोमासे, रूपेश रामटेककर, एजाज शेख उपस्थित होते.