मुंबई :- भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
मुंबई शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांची उपस्थिती राहणार आहे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)