भारतरत्न डॉ.बाबासाहेब अम्बेडकरांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

भंडारा :-” भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक स्त्री पुरुषांच्या उत्थानासाठी भरिव कार्य केले, भारतातील लोक बाबासाहेबांच्या ऋणातून कधीच मुक्त होउ शकणार नाहीत. विविध जाती ,धर्म,पंथ,संस्कृति, भाषा असतांना देखील भारत देशाला संविधानाच्या माध्यमातून एकसंघ ठेऊन बलशाली भारत घडवन्याचे महान कार्य बाबाहेबांच्या हातून घडले. म्हणूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेब भारताचे भाग्यविधाते ठरले. बाबासाहेबांच्या ऋनाची आंशिक परतफेड करावी याच हेतुने या पुतळा परिसराच्या सौन्दर्यीकरणा साठी महाराष्ट्र सरकार कडून 37 लक्ष रूपयांचा निधि खेचुन आणला, तसेच हे काम तबड़तोब सुरु करन्याबाबत सूचना दिल्या आहेत” असे उदगार बाबासाहेबांना अभिवादन करतांना आ.डॉ. परिणय फुके यांनी काढले.

त्रिमूर्ति चौक भंडारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरिता खासदार सुनील मेंढे , आ नाना पटोले , जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पो अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा परिषदेचे सीईओ समीर कुर्तकोटी, न प सीओ विनोद जाधव, राहुल डोंगरे, माजी उपाध्यक्ष न प आशु गोंडाने, माजी उपाध्यक्ष रूबी चड्ढा, मनीष वासनिक, प्रेमसागर गणवीर आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

सकाळी सर्वप्रथम प्रमुख अतिथि च्या हस्ते बाबासाहेबांना माल्यार्पन करण्यात आले, दिप धूप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. या नंतर मान्यवरांच्या हस्ते सौन्दर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन समारोह सम्पन्न झाला.

या प्रसंगी समितिचे सचिव एम आर राउत व संघटक यशवंत नंदेश्वर यांचे हस्ते मा परिणय फुके यांचे शॉल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. खा सुनील मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त असित बागड़े यांचे हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिन्तन करण्यात आले . समिति ला अडीच फूटी पितलेची बुद्धमूर्ति दान केल्याबद्दल माधवी भीमराव बंसोड़ या दाम्पत्त्याचा फुके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी खा मेंढे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत आदरांजलि अर्पण केली. म प्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी संविधान व सार्वजनिक संस्थानांचे संवर्धन करण्याची जवाबदारी सर्व भारतियांचे कर्तव्य आहे, व असे करून या देशातील प्रत्येकाने बाबाहेबांच्या उपकाराची परतफेड करावी, असे आवाहन केले.

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अगदी सकाळ पासुनच आबालवृद्ध, स्त्रीया, पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होताना दिसले, ही गर्दी रात्रि पर्यन्त जशीच्या तशीच होती. रात्रि शहरातील नागरिकांनी रैलीत सहभागी होऊन पुतळा परिसरात येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता मदन बागड़े, एम आर राउत, यशवंत नंदेश्वर, असित बागड़े, डी के वानखेड़े, महादेव मेश्राम, टी के नंदगावली, रविन्द्र भांडारकर, रमेश जांगड़े, डी एफ कोचे, महेंद्र वाहाने, बी सी गजभिये व समितीचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महापौर बनविण्यासाठी बसपचा वार्ड चलो अभियान सुरू....

Sun Apr 16 , 2023
बहुजन समाज पार्टी नागपूर शहर वार्ड समीक्षा बैठक संपन्न. नागपुर : दि.15 एप्रील रोजी दक्षिण विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाज पार्टीचे रामेश्वरी रोड वरचे शहर कार्यालय या ठिकाणी वार्ड समीक्षा बैठक घेण्यात आली होती. मायावती राष्ट्रीय अध्यक्ष बसपा यांच्या आदेशानुसार चलो गाव की ओर/अर्थात चलो वॉर्ड की ओर कार्यक्रम अंतर्गत… महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी एड. सुनील डोंगरे महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com