संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३२ व्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे झेन हाँस्पीटलचे संचालक डॉ आशिष वाजपेयी , रनाळा ग्रामपंचायत चे सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, आमीर खान,कामठी अर्बन निधी बैंक चे संचालक नितीन ठाकरे , दिंव्याग बहुउदेशीय सामाजिक
संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी ‘भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्त्व ‘ याविषयावर मधुकर गिरी सर यांनी मार्गदर्शन केले. अक्षय खोपे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख प्रंसगावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पराग सपाटे प्रस्ताविक नम्रताताई अढाऊ तर आभार दिंव्याशु बोरकर यांनी केले. यांनी केले. याप्रसंगी गणेश सपाटे, विजय टाकभवरे, शेषराव अढाऊ , अमोल नागपूरे, नरेश सोरते, लक्ष्मीकांत अमृतकर रुचीता आष्ठणकर, खुशबु येवले, श्रुतीका मुर्रे , शीतल मेश्राम, कुणाल गजभिये, शिल्पा मस्के, रिया आगरकर ,हिंमाशु लोडेकर प्रामुख्याने उपस्थित होते .