नागपूर :- येथे माळी समाजातील राजकीय समाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकिस ओबीसी संघटना किशोर कन्हेरे यांच्या मार्गदर्शनात विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात माळी समाजाचे अस्तित्व याच विषयावर सांगोपांग चर्चा करून माळी समाजाची भविष्यात राजकीय भूमिका क़ाय असावी त्यादृष्टीने सर्वानुमते ठरविण्यात आले. माळी समाज राजकीय क्षेत्रात नसेल तर आपणास काहीच कोणी देणार नाही म्हणून आपले अस्तित्व आपणच निर्माण करण्या साठी. बैठकीला ऊपस्थित मान्यवरांनी माळी समाज बांधवांनी विधान सभेसाठी एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. बैठकीत विदर्भातील काही विधानसभा क्षेत्रात तयारी करण्याचे संकेत देण्यात आले. विदर्भाचा विचार केल्यास एकुण ६२ विधानसभा मध्ये २० ते २२ लाखापेक्षा जास्त माळी समाजाचे मतदार आहे.आणि बहुतांश विधानसभे मध्ये माळी समाज हा निर्णायक भुमिका पार पाडतात आहे.परंतु राजकीय दृष्टया माळी समाजाला न्याय मिळाला असे दिसत नाही. सर्व राजकीय पक्षानी माळी समाजाला न्याय दावा अशी मागणी समाजातुन येत आहे. राजकीय चित्र पाहाता सर्व पक्ष हे माळी समाजाला डावलत असल्याचे आपनास पाहावयास मिळत आहे.
१) माहाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात समान प्रतिनिधत्व करण्याची संधी प्रमुख राजकीय पक्षानी माळी समाजाला द्यावी.
२) विदर्भातील मोर्शि, वरूड, तसेच काटोल सारख्या मतदार क्षेत्रातून माळी समाजाचा प्रतिनिधि निवडणु पाठवावा.
३) राजकीय पक्षानि विदर्भातील एकुण ६२ विधानसभे पैकी १५ ते २० उमेदवार माळी समाजाचे द्यावे. विदर्भातील १५% माळी समाजाला जर प्रस्थापीत राजकीय पक्ष न्याय देण्याच्या मासिकतेत नसेल तर येणा-या विधानसभा निवडणुकीत माळी समाज आपले उमेदवार ऊभे करेल.
बैठकीला प्रमूख्याने किशोर कन्हेरे (प्रवक्ता शिवसेना) डाॅ.गणेश खारकर (अमरावती), प्रेम सातपूते (मोशिॅ), दिपक वाढई (चंद्रपुर), नंदकिशोर लेकुरवाळे, प्रा.प्रफुल्ल मोजणे, (वरूड), महेश बटकुळे, विजय नाडेकर, किशोर चरपे, संजय बारमासे (नरखेड), प्रा.देवेन्द्र काटे, नंदु कन्हेरे, हरीभाऊ बानाईत, रमेश गिरडकर, महेश अढाऊ, सागर घाटोळे, स्वप्निल वाडकर व समाज बांधव प्रामुख्याने ऊपस्थित होते.