दारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार

भानापेठ परिसरात दारू दुकान सुरु होऊ देणार नाही.
                     
चंद्रपूर – भानापेठ वॉर्ड येथे विजय टॉकीज जवळ सुरु होणाऱ्या बिअर शॉप रद्द करण्याकरिता भानापेठ वॉर्ड संघर्ष समितीने दिवाकर झोडे यांचे नेतृत्वात एल्गार पुकारला आहे. माजी नगरसेवक संजय कंचर्लावार यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
भानापेठ परिसरात बिअर शॉप सुरु होणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ भानापेठ वॉर्ड संघर्ष समितीची बैठक श्री कोलबास्वामी राम मंदिर येथे पारपडली. दिनांक २ मे रोजी परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे संयुक्त निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.
भानापेठ परिसरात सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी दारूचे दुकान होते. तेव्हाच अतिशय वाईट अनुभव असतांना आत्ताच्या काली बिअर शॉप सुरु होऊ देणे म्हणजे मागच्या काळाची वाईट अनुभूती पुन्हा होणार या विचाराने मन तळमळाले. पूर्वीचा इतका वाईट अनुभव असताना पुन्हा तीच चूक होऊ देणार नाही. भानापेठ माझे घर आहे कुठल्याही वाईट गोष्टीची भर इथे कधीच होऊ देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत भानापेठ परिसरात बिअर शॉप सुरु होऊ देणार नाही, तसेच वेळोवेळी आंदोलन देखील उभारू असे यावेळी बोलतांना माजी नगरसेवक संजय कंचर्लावार म्हणाले.
यावेळी राजेंद्र गांधी, दिवाकर झोडे, सुदर्शन बारापात्रे, दिलीप खाडिलकर, राजेश झोडे, शुभम मुक्कावार, छाया डफाडे, माधुरी कोहपरे, कल्पना खाडिलकर, जयंत बोनगीरवार, नितीन मोहाडीकर, लोमेश कुंभारे, मनीष नंदुरकर, उदय वैरागडे, मनीष हेडाऊ, बाळा कोलनकर, रमेश पराते, रमेश झाडे, अनंत बडवाईक, धीरज डफडे, भूपेश वाडगावकर, जयंत गाठे, रमाकांत कोमरवल्लीवार, पुंडलिक सोनकुसरे,  मोहाडीकर, अविनाश डफाडे, रमेश खाडिलकर, बंडू बोनगीरवार, अनिता बोनगीरवार, पुष्पा पतरंगे, रेखा खाडिलकर, साधना कोमरवल्लीवार, अर्चना बारापात्रे, विद्या बोनगीरवार, राजू वाडगावकर, किशोर गुजराथी, दिलीप चिमुरकर आदींची प्रामुख्याने उपस्तीथी होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चांगला नेता होण्यासाठी  निश्चित मार्ग हवा - डॉ. अमोल मौर्य

Wed May 11 , 2022
युवक काँग्रेसच्या निवासी शिबिरात मार्गदर्शन नागपूर  –  चांगला नेता होण्यासाठी त्याला कुठल्या दिशेने जायचे आहे, याचा निश्चित मार्ग माहिती असणे गरजेचे आहे. त्या मार्गावर इतरांना सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता आहे, असे मत  प्रेरक व्याख्याते डॉ. अमोल मौर्य यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या पेंच सिल्लारी येथे आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन दिवसीय निवासी शिबिरात त्यांनी युवक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com