सावनेर :- रा. तू. म. नागपूर विद्यापीठ संलग्नीत स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातर्फे नुकतेच ग्रामपंचायत सावंगी (हेटी) येथे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले. भारताकरिता आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवा या संकल्पनेवर आधारित अनेक सामाजिक आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थान विजयसिंग सावजी यांनी भूषविले तर डॉ. राकेश कभे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना रा. तू. म. नागपूर विद्यापीठ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रसंगी वरिष्ठ पत्रकार बाबाराव टेकाडे, सरपंच अशोक डवरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रशेखर पोटोडे, प्रा. प्रकाश काकडे, प्रा. विलास डोईफोडे प्रामुख्याने उपस्थित होते. अशा प्रकारच्या शिबिरातून समाज आणि देशसेवेकरीता उद्याचे सक्षम नागरिक घडतील असा आशावाद डॉ. कभे यांनी व्यक्त केला तसेच श्रमाची महती विषद केली.
सदर साप्ताहिक शिबिरादरम्यान अनेक सामाजिक आणि बौद्धिक कार्यक्रम आयोजित केल्या गेले, यात सुहासिनी सहस्त्रबुद्धे, ऐ. पी. आय. यांनी रस्तासुरक्षा यावर जनजागृती केली. अश्विन ढोके यांनी फिजिओथेरपी चे महत्व तर महेश शेंडे यांनी थायरॉईड विषयी उपस्थितांना माहिती दिली. डॉ. गुणीला नंदनवार, मेडिकल ऑफिसर, यांनी दैनंदिन जीवनात आहार व आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर सविस्तर भाष्य केले तसेच आरोग्य तपासणी सुद्धा केली. ऍड. अभिषेक मुलमूले यांनी सायबर क्राईम व कायदेविषयक जागृती केली. प्राचार्य पराग निमिशे यांनी डिजिटल साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सुरेंद्र गेडाम यांनी दंततपासणी केली. भारत थापा आणि चंद्रशेखर काळे यांच्या मार्गदर्शनात दररोज व्यायाम, योगासने घेण्यात आली.
रा. स. यो. पथकातील सर्व विद्यार्थ्यांनी दररोज प्रार्थना, ग्रामस्वच्छता, प्रभातफेरी, श्रमदान, जनसंपर्क, सर्वेक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा आणि लिंग समानता यावर गावामध्ये पथनाट्य सुद्धा सादर केले.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पराग निमिशे, विशेष अतिथी ऍड. पल्लवी मुलमूले, माजी नगराध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष विजयसिंग सावजी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी निर्माण करावी, समाजमाध्यमावर जपून वागावे असे प्रतिपादन ऍड. पल्लवी यांनी केले. शिबिराचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. विलास डोईफोडे यांनी केला. प्रसंगी प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी अहवाल वाचन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयंतराव मुलमूले, प्रा. रवींद्र भाके, प्रा. सुनील डोंगरे, प्रा. मिलिंद बरबटे, प्रा. अमिता वाटकर, प्रा. प्रशांत डबरासे, प्रा. प्रविणा साळवे, प्रा. विजय जुनघरे, प्रा. सचिन खरखोडिया, प्रा. प्रवीण दुलारे, प्रा. मेश्राम, प्रा. साक्षी श्रीखंडे, प्रा. कुशवाह, प्रा. पूजा काळे, प्रा. देवांगणी ठोंबरे, उज्वला पांडे, सुरेश बंड, विलास सोहगपुरे, किशोर मानकर, धनेश्वर कठाळे, राजेंद्र धुर्वे, विनोद सुके, मनोज बरोले, राजाराम तागडे, राजू जोगी, हेमंत पोहकर, सुहास तरणकंठीवर, रेणुका मार्बते करिष्मा उईके, धनश्री गोडबोले, पूजा भेलम, निलू निखाडे, सुरेश मेंढे, सुनील मोरे, उपसरपंच सौ. माजरे, गावकरी मंडळी आणि हर्ष नाचणकर, वैष्णवी कोहळे, गीताश्री नवघरे, वसुंधरा करडमारे, मुकुंद शेम्बकर, तरुण मेहंडोले लकी तागडे, उत्कर्षां चौधरी, त्रिवेणी पाटील, श्रुती भोयर, लीला धुर्वे, यश टेकाडे, वंश टेकाडे, देवेंद्र गमे, हिमांशू बोबडे व इतर सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.