शहर स्वच्छतेबाबत वर्तवणुकीत बदल आवश्यक : मनपा आयुक्त

ब्लॅक स्पॉट’ हटविण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी मांडली संकल्पना

नागपूर :- शहराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहेत. प्रत्येक घरातून कचरा संकलीत व्हावा यासाठी मनपाची यंत्रणा कार्यरत आहे. शहरात निर्माण होत असलेले कच-याचे ढिगारे स्वच्छ करणे ही मनपाची जबाबदारी असली तरी उघड्यावर कुठेही कचरा टाकला जाउ नये याची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. एकूणच नागरिकांच्या वर्तवणुकीत बदल झाल्याशिवाय शहराच्या स्वच्छतेबाबत जागरूकता येणार नाही, असे मत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.

नागपूर शहरात निर्माण झालेले कच-याचे ढिगारे किंवा दुर्गंधीयुक्त स्थाने अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ हटविण्याबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मनपा आयुक्तांपुढे संकल्पना मांडली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त  राम जोशी, अधीक्षक अभियंता  मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा व्‍यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी, उपद्रव शोध पथक प्रमुख  वीरसेन तांबे, हर्षल बोपर्डीकर यांच्यासह रोटरी, वेद आणि तेजस्विनी महिला मंडल चे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील सर्व दुर्गंधीयुक्त स्थाने हटवून त्याचे सौंदर्यीकरण करणे, कचरा कुठेही उघड्यावर टाकून त्याचे ढिगारे निर्माण होउ नये यासाठी उपाययोजनात्मक संकल्पनांची मांडणी स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली. यासंदर्भात धरमपेठ झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने कार्य करण्यात येणार असल्याचे स्वयंसेवी संस्थांद्वारे सांगण्यात आले. शहरातील चौक, हेरिटेज स्थळे आदी भागांच्या सौंदर्यीकरणाबाबत आराखडा तयार करून व एक थीम निर्धारित करून कार्य करण्याची सूचना यावेळी मनपा आयुक्तांनी सर्व प्रतिनिधींना केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी जबरी संभोग करणारा आरोपी अटकेत

Fri Sep 16 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी, दी.16 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका 19 वर्षोय अल्पवयीन तरुणीला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन चौधरी हॉस्पिटल जवळील एका घरात नेऊन 5 मार्च 2020 ते 11 सप्टेंबर 2021 दरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व तरुणीशी लग्न करण्यास नकार दिले यासंदर्भात पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क साधला असता आरोपीने या पीडित तरुणीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com