नागपूर : पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या जी-20 या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. महत्वाच्या शासकीय संस्थांच्या संरक्षक भिंती, चौकांमध्ये सिंथेटिक पॅच आदी सौंदर्यीकरणाची कामे सुरु आहेत. महत्वाचे शासकीय कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे सुरु आहेत.येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संरक्षक भींतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. याच रस्त्याने पुढे जीपीओ चौकात सुंदर व सुबक सिंथेटिक पॅच (25X6फुट आकाराचे तीन सिंथेटिक पॅच) तयार करण्यात आले आहेत. देवगिरी चौकाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींवर विविध भूमीतीय आकारांच्या आणि फळांच्या आकाराच्या कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत. देवगिरी चौकात चारही बाजुंनी सिंथेटिक पॅच (25X6 फुट आकाराचे) तयार करण्यात आले आहेत. तर लेडिज क्लबच्या संरक्षक भिंतींवर शार्क मासा, ऑक्टोपस आदी समुद्री जीव उत्तमरित्या रेखाटण्यात आली आहेत. याच चौकात जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या संरक्षक भिंतींवर वाघ, सिंहासह विविध वन्य प्राणी आणि वारली चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या सर्व सौंदर्यीकरणामुळे या परिसरास देखणे रुप प्राप्त झाले आहे. जी-20 परिषदेसाठी शहराची सज्जता यातून ठळकपणे दिसून येते.
जी-20 परिषदेसाठी शहरात ठिकठिकाणी सौंदर्यीकरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com