अमरदिप बडगे,प्रतिनिधी
प्रशासकीय इमारतीत थुंकण्यास बंदी,थुंकल्यास होणार आर्थिक दंड
माहिती किंवा फोटो अथवा व्हिडीओ काढणाऱ्यास मिळणार बक्षीस
गोंदिया :- नेहमीच आपण बघतो की कोणत्याही शासकीय कार्यालयात सर्वत्र भिंती आणि कोपरे खर्या, तंबाखू, गुटखा खाऊन भिंतीची लाल रंगात असल्याची अवस्ता आपण नेहमीच बघतो, पण आता धूम्रपान करून थुंकणाऱ्यावर आता असणार नजर. सावधान व्हा जर गोंदिया शहरा मधील प्रशासकीय इमारती 30 शासकीय कार्यालय आहेत. यात रोज हजारो लोकांची ये-जा असते. या ठिकाणी अनेक नागरिक तंबाखू, खर्रा ,गुटखा, पान खाऊन थुंकून भिंती रंगवण्याचे चित्र आहे. मात्र आता असे धूम्रपान करणाऱ्यांना असे करता येणार नाही. कारण उपविभागीय अधिकारी यांनी परिपत्रक काढून दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहे.
शासकीय कार्यालय मधील अनेक कर्मचाऱ्यांना तंबाखू , गुटखा, खाण्याचे व्यसन आहे. अनेक नागरिक यांना सुद्धा तंबाखू जन्य खाण्याची सवय आहे. यामुळे शासकीय कार्यालय मधील भिंती ची अवस्था सर्व परिचित आहे. हीच बाब लक्षात घेऊन गोंदिया च्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी प्रशासकीय इमारत मधील 30 कार्यालय करिता परिपत्रक काढून कोणताही कर्मचारी तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन करून कार्यालयात येणार नाही. सोबत च कोणतेही नागरिक तंबाखू, गुटखा, खाऊन थुंकताना आढळल्यास त्याच्यावर दंड आकारण्यात येणार आहे.