आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीसाठी 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते व त्यानंतर या हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येत नव्हते. त्यानुषंगाने शासन पत्रान्वये NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाकडून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

          तरी जे शेतकरी NEML पोर्टलवर नोंदणीकरीता वंचित आहेत त्यांनी नजिकच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर स्वत:चे चालू हंगामाचे 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करुन शेतकरी नोंदणी करुन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपूर शहर तर्फे मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला

Mon Dec 13 , 2021
नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर च्या वतीने सुरेश भट सभागृह येथे व्हरचुअल रॅली च्या माध्यमातून ऑनलाईन साजरा करण्यात आला.यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील प्रमुख मान्यवरांचे प्रोजेक्टच्या माध्यमातून मनोगत लाभले. आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आला. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com