बार्टीने शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करून सर्वांना फेलोशिप द्यावी – संशोधक विद्यार्थ्यांची मागणी 

नागपूर :-पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी तर्फे देण्यात येणारी संशोधन अधिछात्रवृत्ति (फेलोशिप) मिळण्यासाठी 17 डिसेंबरला घेण्यात येणारी बी ए एन आर एफ- 22 साठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करून बार्टी द्वारे पात्र असलेल्या सर्वच 761 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. या मागणीसाठी आज बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती नागपूर विभागाच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालयाला एक निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर महानागरत्न, लालदेव नंदेश्वर, उत्तम शेवडे, संदीप शंभरकर, ममता सुखदेवे, योगिता पाटील, नितीन जगताप आदी संशोधक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. यांनी हे निवेदन मुख्यमंत्री सचिवालयातील शिबिर कार्यालयात दिले आहे. उद्या राज्याचे मुख्य सचिव व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अट्टल दुचाकी चोर उमरेड पोलीसांच्या ताब्यात

Wed Dec 13 , 2023
उमरेड :- मागील काही दिवासापासुन पोलीस स्टेशन उमरेड तसेच आजुबाजुच्या परीसरातुन दोन चाकी मोटार सायकल चोरून चोरटे धुमाकुळ घालीत होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पो.स्टे, उमरेडचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी मोटार सायकल चोर पकडण्यासाठी उमरेड पोलीस स्टेशनचे एक पथक तयार केले, उमरेड पोलीसांचे पथक मोटार सायकल चोरीच्या सबंधाने पोस्टे हद्दीत पेट्रोलीग करून धागेदोरे तपासत असताना पथकास गुप्त बातमीदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com