रमानगर उडाणपुल बांधकामाच्या कासवगती विरोधात बरीएम चा तीव्र आंदोलन पूकारण्याचा ईशारा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित सहा वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.नुकतेच केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दीनापूर्वी उडानपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेशीत केले मात्र निगरगट्ट व भावनाशून्य स्वभावाचे धनी असलेल्या या कंत्राट दाराला कामाचे कुठलेही गांभीर्य नसल्याने कामातील संथपणा कायम असून कामाला गती न देता उलट कामातील कासवगतीपणा कायम आहे ज्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी हे उडानपूल बांधकाम पूर्णत्वास होईल याची कुठलीही शाश्वती वाटत नाही परिणामी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट द्यायला येणाऱ्या अनुयायांची वाहतुकीची मोठी गैरसोय होणार आहे जे सहन करण्याच्या पलीकडे आहे.त्यामुळे सदर संथगतीने सुरू असलेल्या बांधकामासंदर्भात होत असलेल्या त्रासाला कंटाळूण बरीएम तर्फे लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपूल बांधकाम सण 2020 पर्यंत करून देणे हे नियोजित होते मात्र दरम्यान आलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे काम थंडबसत्यात असल्याने पुनश्च या कामाला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ संपूनही बांधकाम पूर्णत्वास येईना अशी स्थिती आहे.यासंदर्भात आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच ड्रॅगन पॅलेस वर्धापन दिनानिमित्त देशाच्या कोण्या कोपऱ्यातून मोठ्या संख्येत अनुयायी येणार आहेत.दरम्यान ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया तसेच आजनी भुयार पुलिया मार्गाने जडवाहतुकीने येणाऱ्या अनुयायांना गैरसोयीचे ठरणार असून रमानगर उडानपुल हा अत्यंत जलदगती तसेच सोयीचा ठरणार आहे.त्यामुळे या उडानपुलाचे बांधकाम धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी पूर्णत्वास येऊन लोकोपयोगी यावा यासाठी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी खुद्द केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्याशी सदर बाबतीत अवगत करून दिले यावर कंत्राटदाराचा मनमानिपना लक्षात आल्यानंतर गडकरी यांनी कंत्राटदाराला खडेबोल सुनावले व लवकरात लवकर दिवसरात्र काम करून धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेशीत केले मात्र या निगरगट्ट कंत्राटदाराचा मनमणीपणा कमी होत नसून कामाला पाहिजे तशी गती नसल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता वाटत नसल्याने सहनशिलता संपण्याच्या मार्गावर असून यासंदर्भात कंत्राटदाराविरोधात बरीएम तर्फे लवकरच मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी

Thu Aug 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मुंबई लगतच्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.बदलापूर मधील एका शाळेतील मुलीवर झालेल्या अत्याचारा नंतर देशभरात संताप व्यक्त केल्या जात असताना कामठी तालुक्यातील महिलांनी आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या. 1)प्रांजल वाघ माजी सरपंच ग्रा प कढोली – महिला व मुलींवरील अत्याचार होणे ही बाब समाजमन सुन्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!