गट ग्रामपंचायत बिडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी          

कामठी :- काल दिनांक 2/8/2023 रोज बुधवारला सकाळी 11 वाजता बीडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे यांचे नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी तसेच बीडगाव गट ग्रामपंचायतचे स्थानिक रहिवासी नागरिक गण यांचे उपस्थितीत मोठ्या संख्येने गावातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन जसे उर्वरित रस्ते, नळ पाईपलाईन, वीज पुरवठा, स्मशान घाट निर्माण ,संविधान भवन, आरोग्य सेवा केंद्र ( दवाखाना) सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट. इत्यादी जनसामान्यांच्या समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडी शाखा बीडगावच्या वतीने गट ग्रामपंचायत बिडगाव येथे मोठ्या संख्येने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी विदर्भ पूर्व संयोजक भगवान भोंडे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विश्रांती रामटेके, जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, कामठी मौदा विधानसभा प्रमुख सीसी वासे, तालुका अध्यक्ष प्रशांत वाघमारे, शहराध्यक्ष रवी शेंडे, शहर उपाध्यक्ष अशोक वाघमारे, शहर महासचिव वैशाली वाघमारे, ज्येष्ठ नेत्या वनमाला उके, वंचित चे कार्यकर्ता धम्मदीप लोखंडे, शाखा कार्यकर्ता सलमान पठाण, बिडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे, शाखा अध्यक्ष महिला आघाडी निर्मला मेश्राम, शाखा संघटक राजेश ढोके, शाखा महासचिव निखिल भांगे, शाखा महासचिव जामगडे रीता जामगडे, शाखा संघटिका शालू सहारे, बीड गाव शाखा प्रवक्ता सदानंद शेंडे कामठी तालुका प्रवक्ता जगदीश रंगारी, शहर उपाध्यक्ष अशोक वाघमारे, रामचंद्र दुदुके, उपाध्यक्ष सुदेशना मेश्राम, कोषाध्यक्ष सरला मेश्राम, विनोद गजभिये, परिंदा सोमकुवर, रागिनी ढोके, बेबीनंदा सनेल कामठी तालुका आणि बिडगाव शाखेचे पदाधिकारी , कार्यकर्ता गण व गावातील नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात चेरी कंपनी पासून करण्यात आली. गट ग्रामपंचायत बिडगाव या ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरपंच यांचे कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Roshan Raut conferred with 'Rashtriya Prerna Award'

Thu Aug 3 , 2023
Nagpur :- Noted Social Worker roshan raut was honoured with ‘Rashtriya Prerna Award 2023’ at a programme organised recently at The Park Hotel Indore. the programme was organised jointly by National Guru India Conference and World Book of Star Record.he received the award for his contribution of society through his various social campaigns.he was Honoured with ‘State Inspiration Award 2023’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com