-भारत बंद ची सुरुवात कामठीच्या जयस्तंभ चौकातून होणार
कामठी ता प्र 24:-देशाची एकता ,अखंडता धोक्यामध्ये टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे .संघ आणि भाजप देशद्रोही असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाने केला आहे.याविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात 25 जून रोजी ‘भारत बंद ‘ची हाक देण्यात आली असून या भारत बंद ची हाक कामठी शहरातून सुद्धा देण्यात येत असून उद्या 25 जून ला सकाळी साडे अकरा वाजता कामठी च्या जयस्तंभ चौकातून भारत बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल तेव्हा जास्तीत जास्त संख्येतील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी हेमलताताई पाटील यांनी केले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या म्हणण्यानुसार देशात ज्ञान व्यापीचा मुद्दा भाजप आर आरएसएस द्वारा उपस्थित करण्यात आला आहे.मथुरा, अयोध्या आदी मुद्द्यावर राजकारण करण्यात येत आहे.भाजप च्या इशाऱ्यावर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विरोधात विधान केले त्यामुळे देशाचे वातावरण बिघडले.हिंदू, मुस्लिम,समाजातील नागरिकांना एकमेकाविरोधात उभे करण्याचे कारस्थान भाजप सरकारचे आहे. या विरोधात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात 25 जून रोजी भारत बंद चे आवाहन करण्यात आले असल्याचे बहुजन क्रांती मोर्चाचे हेमलताताई पाटील यांनी केले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाने दिली 25 जून ला कामठीतुन भारत बंद ची हाक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com