बदलापूर अत्याचार प्रकरणातील FIR गायब? आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न अन्…; वकील असीम सरोदेंचे गंभीर आरोप

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि दोषारोपनाच्या प्रक्रियेत न्याय मिळावा, या उद्देशाने वकील असीम सरोदे बदलापुरातील पीडित मुलीची बाजू मांडणार आहेत. बदलापूर प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. याप्रकरणात नेमकं काय घडतंय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केलेत. या धक्कादायक प्रकारानंतर या चिमुकल्या मुलींचे आई-वडील पोलिसात तक्रार दाखल करायला गेल्यानतंर पोलिसांनी त्यांना १२ तास थांबून ठेवलं. त्यावरूनच बदलापूरसह राज्यात काही ठिकाणी पडसाद उमटलेत. २० ऑगस्ट २०२४ रोजी बदलापूरकरांनी तब्बल ११ तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं. माणुसकी काळीमा फासणाऱ्या या प्रकारात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पिडीत मुलींची बाजू मांडण्यासाठी वकील असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात आपलं वकीलपत्र सादर केलं. तर आरोपीला वाचवण्यासाठी तो गतीमंद असल्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला. तर पोलिसांनी आरोपीवर केलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याऐवजी कमकुवत कलमं लावली असल्याचेही असीम सरोदे म्हणाले.

Source by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजनी येथील जि.प.शाळेत दहीहंडी उत्सव साजरा 

Tue Aug 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नव नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या आणि कामठी तालुक्यात आजनी गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनीच्या वतीने मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यात विद्यार्थ्यांची श्रीकृष्ण, राधा वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. वर्ग केजी १ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com