नागपूर :- उत्तर नागपूरच्या मेकोसाबाग- लुंबिनी नगरातील रमाई बौद्ध विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने सोमवार 11 एप्रिल ला सायंकाळी 6.30 वाजता संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष ऍड संदीप ताजने, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी व विदर्भ विभागाचे प्रमुख ऍड सुनील डोंगरे, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमनकुमार कांबळे व या परिसरातील लोकप्रिय माजी नगरसेविका ममता महेश सहारे हे प्रामुख्याने प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा पुतळा नागपुरातील बसपाचे प्रसिद्ध युवा कार्यकर्ते महेश सहारे यांच्या सिद्धांत नावाच्या मुलाने दान दिलेला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने बसपाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केलेले आहे.