‘बाबासाहेबांचा जयजयकार’ ने केले मंत्रमुग्ध

संदीप कांबळे, कामठी

-जिल्हाधिकारी आर विमला च्या हस्ते शिवा मोहोड चा सत्कार
कामठी ता प्र 17:-कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात 11 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत आयोजित ‘भीम महोत्सव’चा थाटात समारोप झाला.
शेवटच्या दिवशी शिवा मोहोड यांच्या ‘बाबासाहेबांचा जयजयकार’या संगीतमय कार्यक्रमातून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाआदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आर विमला यांच्या हस्ते ‘बाबासाहेबांचा जयजयकार’या गाण्याचे गीतकार, संगीतकार व गायक शिवा मोहोड यांना शॉल व बाबासाहेबांची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे व रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई प्रामुख्याने उपस्थित होते.
सम्राट अशोक,तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून घोरपड सारख्या लहान गावातून आलेल्या शिवा मोहोड यांच्या ‘बाबासाहेबांचा जयजयकार’या गीताचे टी सिरीजनी सुद्धा दखल घेतलेली आहे.व पुढे त्याला स्टार प्रवाह सारख्या वाहिनीने सुद्धा आमंत्रित केले आहे.हा सर्व शिवा मोहोड यांचा प्रवास तरुणांना आदर्श देणारा असल्याचे मत ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.
‘भीम महोत्सव’या समारोपीय सांस्कृतिक कार्यक्रमात लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होतो.सांस्कृतिक कार्यक्रमांचे अप्रतिम संचालन यवतमाळ येथील तरुण साहिल दरने यांनी करून उपस्थितांचे मने जिंकली.बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक प्रबोधनकार गीत एस के फ्युजन बँड च्या वतीने सादर करण्यात आले.
‘भीम महोत्सव’च्या यशस्वी आयोजनाकरिता अजय कदम, दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, सुनील वानखेडे,सचिन नेवारे,राजेश गजभिये, सुभाष सोमकुवर,अनुभव पाटील,रेखा भावे, वंदना आळे,सावला सिंगाडे,अश्फाक कुरेशी, दीपक सिरीया, तसेच ओगावा सोसायटी , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दादासाहेब कुंभारे बहुउद्देशोय प्रशिक्षण केंद्रातील सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीत शव वाहिनी सह मर्चुरी फ्रिजर बौद्ध समाजात उपलब्ध

Sun Apr 17 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 17:- बहुसंख्यक समुदाय असलेल्या बौद्ध समाजात समाजाच्या सहकार्याने निर्वान रथ शव वाहिनी मागील तिन वर्षापासुन उपलब्ध करण्यात आली आज आंबेडकर चळवळी तील जेष्ठ समाजसेवी दिवंगत देवाजी भीमटे यांच्या मृत्यु नंतर होणारा परंपरागत संस्कारांवर खर्च न करता सामाजिक हितासाठी धम्मक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्व विध्याताई कीशोर भीमटे या परिवाराने वर्तमानातील गरज लंक्षात घेता पाऊन लाखाचे मर्चुरी फ्रिजर समाजास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com