भा.ज.पा. सरकार व संघ परिवाराने देशहितार्थ भारतीय राज्यघटना व लोकशाही यांची हत्या करू नये – ऍड. डॉ. सुरेश माने

नागपूर :- राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या एजेंड्यापोटी, देशात सर्वत्र आपलीच अमर्याद सत्ता असावी या भाजप च्या हवास्यापोटी व सर्वकश राजकीय सत्तेच्या माध्यमातून भाजपा व संघ परिवार समर्थक भांडवलदरांच्या तिजोऱ्या भरण्याकरिता केंद्रातील भाजपा मोदी सरकारने व त्याच बरोबर हिंदुत्ववादी संघ परिवारने स्वातंत्र्यलढ्याच्या बलिदानातून निर्माण झालेल्या तसेच भारतीय राज्य घटनाकारांच्या प्रखर निष्ठावंत देशाचेच हितप्रथम व अंतिमत: देशाचेच हित सर्वांच्य: मानणाऱ्या भारतीय लोकशाही व राज्यघटनेची, संसदेतील व सामाजिक बहुमताच्या आधारे हत्या करता कामा नये असे खुले जाहीर आव्हान बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथे बी.आर.एस.पी. च्यावतीने आयोजित जाहीर सभेमध्ये केंद्र मोदी शहा, सरकारचा समाचार घेतांना काढले.

या प्रसंगी विचार पिठावर वक्ते म्हणून प्रा.रणजित मेश्राम, सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन नागपूर ला करण्यात आले होते. आणि सभेला बी.आर.एस.पी. समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 8-9 वर्षातील भा.ज.पा. सरकारच्या कालावधीची कडी समीक्षा करीत ऍड.डॉ.सुरेश माने यांनी गुजरात दंगली पासून ते मणिपूर हिंसाचारा पर्यंत भाजपा-संघ परिवाराच्या भूमिकांचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून परामर्श घेत एका बाजूला विकासाचे ढोल वाजविणाऱ्या भाजपच्या शासन कालखंडात बेकारी महागाई यातील प्रचंड वाढ याशिवाय शेती, शेतकरी, शोषित समाज घटकांचे कल्याण यामधील गोरगरिबांची घटती भागेदारी दर आरोग्य शिक्षण, देशाचे संरक्षण यासारख्या देशहिटकारक महत्वपूर्ण बाबी या भांडवल देशातील भाजपा समर्थक भांडवलदारांच्या घश्यात घालून देशातील साधन संपत्तीची विल्हेवाट कशी लावली जात आहे याचा पडाच जाहीर सभेत मांडला मात्र हे थांबविण्यासाठी संविधान लोकशाही विरोधक व संविधान लोकशाही समर्थक हाच संघर्ष 2024 लोकसभा रंनांगणात करून राष्ट्रविरोधी भाजपा संघपरिवार नीती याचा पाडावं करण्याची जबाबदारी भारतातील सर्व लोकशाही व भारतीय राज्यघटना समर्थकांनी आपल्या खांद्यावर समर्थपने पेलली पाहिजे असेही ऍड डॉ सुरेश माने यांनी भाजपा-संघ परिवार विरोधकांना ठणकावले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते म्हणून आंबेडकरी विचारावंत प्रा. रणजीत मेश्राम व दै लोकमत चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने हे देखील उपस्थित होते दोघांनीही आपापल्या भाषणामध्ये आगामी सांगर्षात या देशातील प्रत्येक संविधान प्रेमी नागरिकांनी असंविधानिक भाजपा सरकार व त्यांची बेलगाम सत्ता यांना उध्वस्त करण्याचे आव्हान केले याशिवाय याकरिता भाजपा संघ परिवारातील सर्व विरोधकांची एकजूट मजबूत भेट म्हणून पक्ष कार्यासाठी रु. एक लाखाचा धनादेश करण्याचे अवघड इंद्रधुनुष्य पेलावे लागणार असल्याची आठवण प्रखरतेने करून दिली.

या कार्यक्रमध्ये बी.आर.एस. पी.विदर्भ प्रदेश तर्फे ऍड.डॉ. सुरेश माने यांना त्यांच्या जन्मदिनाचे भेट म्हणून पक्ष कार्यासाठी रु एक लाख चा धनादेश व शाल देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षाचे राष्ट्रीय उपाधक्ष रमेश पाटील यांनी केलं तर पक्षाचे पदाधिकारी यांनी समयोचित विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे तर आभार प्रदर्शन नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ विनोद रंगारी यांनी केलं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखेर पंचायत समिती सभापती संजय नेवारे अपात्र

Fri Aug 11 , 2023
– विहीत मुदतीत जात वैधता दस्तावेज सादर न करणे भोवले रामटेक :- ७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत पंचायत समीती सदस्य म्हणुन निवडुन आलेले व नंतर पंचायत समिती रामटेक येथील सभापती पदावर आरूढ झालेले संजय नेवारे यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने स्वतःचे पद गमावले आहे. विभागीय आयुक्तांनी नुकतेच याबाबदचे आदेश काढुन त्यांना अपात्र घोषीत केले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com