सीएसआयआर-एनपीएल ने “एक सप्ताह एक प्रयोगशाळा” कार्यक्रमा अंतर्गत आयोजित केली “मेट्रोलॉजी परिषद”
नवी दिल्ली :-वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनपीएल), 17 ते 21 एप्रिल 2023 दरम्यान, ‘वन वीक वन लॅब’ (OWOL), अर्थात, ‘एक सप्ताह एक प्रयोगशाळा’ कार्यक्रम साजरा करत आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि सीएसआयआर चे उपाध्यक्ष, डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारताची राष्ट्रीय मोजमाप संस्था (NMI) असल्यामुळे, “मेट्रोलॉजी कॉन्क्लेव्ह”, अर्थात मोजमाप शास्त्र परिषद, या एक दिवसीय कार्यक्रमात, मेट्रोलॉजी, अर्थात मोजमाप आणि त्याच्या वापराचे शास्त्र, या सीएसआयआर-एनपीएल च्या प्रमुख पैलूवर भर देण्यात आला.
अलिकडच्या काळात, मोजमाप शास्त्र आणि अचूक मोजमाप हे महत्वाचे घटक असून, ते उत्पादनाची गुणवत्ता परिभाषित करतात आणि त्याच्या मानकीकरण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. देशाची अर्थव्यवस्था आणि तिची वृद्धी त्याच्या अचूक मोजमाप क्षमतेवर अवलंबून असते. सर्वसामान्य लोकांमध्ये योग्य आणि अचूक मापन पद्धती आणि देशाच्या समृद्धीसाठी त्याची गरज, याबाबत जागृती निर्माण करणे, हे मेट्रोलॉजी कॉन्क्लेव्ह चे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रमोद कुमार तिवारी, महासंचालक- ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (DG-BIS) आणि सन्माननीय अतिथी जक्षय शाह, संचालक- क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. वेणुगोपाल अचंता संचालक, सीएसआयआर-एनपीएल, डॉ. रितू श्रीवास्तव, सह-संचालक- OWOL, आणि डॉ. नवीन गर्ग वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक उपस्थित होते.
प्रा. वेणुगोपाल अचंता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेट्रोलॉजीच्या उत्क्रांतीच्या पैलूंचा थोडक्यात आढावा घेतला आणि मेट्रोलॉजीच्या क्षेत्रात सीएसआयआर-एनपीएल ने केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. प्रा. अचंता यांच्या भाषणातील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे NPL “वेस्ट टू वेल्थ” हे धोरण. हे देशातील सिलिकॉनच्या वाढत्या मागणीमुळे , मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या सिलिकॉन कचऱ्याचा सामना करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. सीएसआयआर प्रयोगशाळा, बीआयएस आणि क्यूसीआय यांच्या सहकार्याने दुय्यम मानकांच्या मेट्रोलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
आपल्या भाषणात, QCI चे संचालक, जक्षय शाह यांनी सांगितले की, मेक इन इंडिया उत्पादनांच्या (कौशल्य, प्रमाण आणि वेग यावर लक्ष केंद्रित करून), गुणवत्तेच्या आणि प्रमाणाच्या संदर्भात पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत” या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, आपण केवळ जागतिक मागणीची पूर्तता न करता, उत्पादनाचा स्वीकृती दर देखील वाढवायला हा, यावर त्यांनी भर दिला. विश्वासार्हता आणि गुणवत्तेची पूर्तता केवळ चार स्तंभांच्या आधारावरच होऊ शकते. ते म्हणजे, सीएसआयआर-एनपीएल, मेट्रोलॉजी कायदे, BIS आणि QCI-NABL. भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यामधेही हे उपयोगी ठरेल. प्रमोद कुमारी तिवारी, IAS, DG-BIS, यांनी प्रशिक्षण आयोजित करणे, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सक्षम करणे, यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे सामान्य लोकांमध्ये मेट्रोलॉजिकल कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सुचवले की, येत्या काही वर्षांत प्रशिक्षित कर्मचारी निर्माण करण्यासाठी, आपल्या देशातील शैक्षणिक संस्था मेट्रोलॉजी क्षेत्रात अभ्यासक्रम तयार करण्याच्या आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याच्या धोरणावर काम करू शकतात. त्यांनी भारतभर, एकाच छत्राखाली चाचण्या, वर्गवारी, आणि प्रमाणीकरण प्रयोगशाळांचा डेटाबेस तयार करण्याची सूचना दिली. या कार्यक्रमात, प्रख्यात शास्त्रज्ञांनी भौतिक परिमाणांच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांवर, त्यांच्या मेट्रोलॉजिकल पैलूंबाबत माहिती देणारी व्याख्याने दिली. यामध्ये पर्यावरणासाठी मेट्रोलॉजी, अवजड अभियांत्रिकी उद्योगांसाठी मेट्रोलॉजी, भारतीय निदेशक द्रव्य (बीएनडी) साठी मेट्रोलॉजी, आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी मेट्रोलॉजी, ई-मोबिलिटी आणि एनर्जीसाठी मेट्रोलॉजी, फोटो-व्होल्टेइक मेट्रोलॉजीसाठी मेट्रोलॉजी, इत्यादीचा समावेश होता. या कार्यक्रमात सीएसआयआर-एनपीएल ची मेट्रोलॉजीमधील भूमिका आणि प्रयत्न आणि भविष्यासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी सीएसआयआर-एनपीएल चा पथदर्शक आराखडा देखील प्रदर्शित करण्यात आला. सीएसआयआर-एनपीएल इथल्या मेट्रोलॉजी विषयक प्रगतीवर एक माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये एनपीएल मधील सर्व नवीन घडामोडींचा समावेश असून, ही पुस्तिका विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल. ” सीएसआयआर-एनपीएल कडून अपेक्षा आणि भविष्यातील दिशानिर्देश” या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये BIS, NABL कायदेशीर मेट्रोलॉजी, उद्योग आणि संशोधन आणि मानांकन प्रयोगशाळेतील तज्ञांनी मेट्रोलॉजिकल क्षेत्रातील आव्हाने आणि यावर एनपीएल द्वारे पुरवल्या जाऊ शकणार्या जाणाऱ्या संभाव्य उपायांवर चर्चा झाली. हे एक फलदायी सत्र होते ज्याने सहयोगाचा नवा आयाम खुला केला, जो येत्या काही वर्षांत देशाच्या विकासासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी, एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दिल्ली आयआयटी आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना व्याख्यानांचा फायदा झाला आणि त्यांनी मेट्रोलॉजीमध्ये करिअर करण्यात रस दाखवला. कार्यक्रमाची सांगता पुरस्कार वितरण समारंभाने आणि आभार प्रदर्शनाने झाली. सीएसआयआर-एनपीएल आणि त्याच्या “वन वीक वन लॅब” कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी, कृपया NPL वेबसाइटला: https://www.nplindia.org/ आणि NPL सोशल मीडिया हँडल (You Tube, Facebook, LinkedIn, Instagram, Twitter) येथे भेट द्या. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण NPL YouTube चॅनलवर पाहता येईल.