नागपूर :- आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, माहिती व जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सहायक अधीक्षक  राजकुमार मेश्राम, कैलाश लांडे, अमोल तपासे, विनोद डोंगरे, शैलेष जांभुळकर आदी उपस्थित होते.    

– शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करावे: राज्यपालांची सूचना मुंबई :- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले असल्याचे नमूद करून पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. मुंबईतील व्हिला टेरेसा हायस्कूलचा वार्षिक दिवस तसेच पुरस्कार वितरण समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख […]

– Governor, CM, Dy CMs release postage stamp on Shahaji Raje Bhosale Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Chief Minister Eknath Shinde released the postage stamp on Shahaji Raje Bhosale at Raj Bhavan Mumbai on Fri (18 Aug). The postage stamp was released at the valedictory function of the ‘Majhi Mati, Majha Desh’ campaign organised as part of […]

– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम नागपूर :- नियमित वृत्तपत्रीय लिखाणामध्ये प्रमाणलेखनाचा वापर व्हावा, वारंवार होणाऱ्या चुका व चुकीच्या शब्दांचा वापर टळावा. वृत्तलेखनाचा दर्जा वाढवा यासाठी शुद्धलेखन व योग्य शब्दांच्या वापरासंदर्भातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माध्यम प्रतिनिधींच्या दैनंदिन लिखाणात सुधारणा […]

मुंबई :- बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत www.awards.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबई शहर व उपनगरातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. वयवर्ष ५ पेक्षा अधिक […]

मुंबई :- महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना […]

मुंबई :- केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांत दोन हजार रुपये, नागरी क्षेत्रांमध्ये (नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका) सहा हजार रुपये, महानगर (Metropolitan) क्षेत्रांमध्ये आठ हजार रुपये दरमहा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी […]

– सर्वसामान्यांची सोय : मध्य रेल्वेने जारी केली अधिसूचना नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील स्लिपर कोचची संख्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची यामुळे विशेष सोय होणार आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात डब्यांची नवीन स्थिती एका अधिसूचनेद्वारे जारी केली आहे. २२ नोव्हेंबरला नागपूरहून मुंबईला […]

२०४७ पर्यंत किमान पाच विद्यापीठे जागतिक स्तरावर आणण्याचे राज्यपालांचे आवाहन शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांसाठी उद्दिष्टे ठरविण्याची केली सूचना मुंबई :- स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांकरिता आपली उद्दिष्टे निर्धारित करण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. सन २०४७ पर्यंत राज्यातील किमान पाच विद्यापीठांनी जगातील १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यासाठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – अपघातात पती, पत्नी व नऊ वर्षाची मुलगी जख्मी.  कन्हान :- महामार्गावरील डुमरी स्टेशन जवळ डुमरी कोळसा यार्ड मध्ये कोळसा भरून जाणा-या ट्रक ने कुठलेही सिगंल न देता निष्काळजीने ट्रक चालकाने ट्रक चालवुन दुचाकीला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक, मागे स्वार त्याची पत्नी व नऊ वर्षाची लहान मुलगी जख्मी झाल्याने कन्हान पोलीसानी आरोपी ट्रक चालका […]

आदिवासी विकास विभाग सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर 6838 कि.मी. लांबीचे रस्ते […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – परिसरात भीतीचे वातावरण, पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत संताजी नगर कांद्री येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन साढे तीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.१७) ऑगस्ट ला सकाळी […]

मुंबई :- प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यात शासकीय / खासगी भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी संयुक्त भागिदारी तत्वावर गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची […]

– सद्‌भावना दिनानिमित्त शपथ नागपूर :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न व भारतातील संगणक क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (18) रोजी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करुन नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सर्वांनी सद्‌भावना दिनाच्या निमित्ताने सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा घेतली. मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी प्रतिज्ञा चे वाचन […]

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त राजलक्ष्मी शाह यांनी पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामुहिकपणे सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी उपायुक्त प्रदीप कुळकर्णी, धनंजय सुटे, घनश्याम भुगावकर, चंद्रभान पराते, दीपाली मोतीयेळे, नायब तहसिलदार आर.के.डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एखाद्या रहस्यमय चित्रपटाचा शेवट सिनेमागृहात शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुम्हाला आधीच सांगून तुमचा मूड पार बिघडवून मोकळे व्हावे पद्धतीचे माझे हे लिखाण आहे म्हणजे राज्याच्या राजकारणात पुढे नेमके नक्की निश्चित काय घडणार आहे तुम्हाला मी येथे सांगणार आहे त्यातून तुमची उत्कंठा संपणार नाही तर आणखी आणखी वाढणार आहे, तुमचे डोळे मी सांगितलेले ऐकून व्हिस्फारणार आहेत. आज या तारखेला जरी भाजपा महायुतीमध्ये […]

नागपूर :- बहुजनांनो जर भारताचे संविधान वाचवायचे असेल तर बहुजन समाजाचे संघटन असलेल्या बसपाला मजबूत करावे, कारण आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्या काँग्रेसने संविधानाची ऐशी तैशी केली तर भाजप सरकार संविधानालाच निकालात काढायला निघाली आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर यांनी व्यक्त केले. काल वाठोडा येथील संत गोरा कुंभार सभागृहात पूर्व नागपूर विधानसभा संघटन समीक्षा […]

रामटेक :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने नुकताच दिनांक १७ ऑगस्ट ला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे यांच्यावर विश्वास ठेवत रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्मान वाहतुक सेनेत प्रवेश केला. यावेळी प्रामुख्याने रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष खेमेंद्र (गुड्डू) पारधी व वरिष्ठ पदाधिकारी किरण जाधव यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कन्हान नदी पुला सामोर विरूध्द दिशेने दुचाकी चालकाने आपले वाहन निष्काळजीने चालवुन सामोरून अचानक चारचाकी वाहनास धडक मारून खाली पडुन दुचाकी चालक व मागे स्वार महिला जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेशनला दुचाकी चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सुनितकुमार अमिरदास सोनवानी वय २६ वर्ष रा. झुजर तह. घुगरी जि. मंडला […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन अंतर्गत संघर्षनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून शुक्रवारी (ता.१८) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी संघर्ष नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी कुंभारे, डॉ.प्रीती चोपकर, सुनील आगरे, राम सामंत, जीएनम खुशाली उमाठे, रश्मी हलमारे, एएनएम वैशाली मेश्राम, शैफाली श्यामकुवर, गीता […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com