कन्हान :- केशवराव देवाजी कांबळे कॉन्हेट टेकाडी येथे क्रिडा स्पर्धासह भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि ख्रिसमस थाटात साजरा करण्यात आला.
बुधवार (दि.२५) डिसेंबर २०२४ ला केडीके कॉन्हेट टेकाडी येथे शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख पाहुणे पत्रकार किशोर वासाडे, लोकेश चिंचुलकर, तेजस कुंभलकर, विशाधर कांबळे आदीच्या प्रमुख उपस्थित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व येशु च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केक कापुन क्रिडा स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.
एका विद्यार्थ्याने शांताक्रुज च्या वेष धारण करून सर्व विद्यार्थांना चॉकलेट वाटप केले. विविध क्रिडा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्याना खाऊ आणि पाहुण्याना नास्ता वाटप करून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि ख्रिसमस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केडी के कॉन्हेट टेकाडी च्या मुख्याध्यापिका निशा देशमुख, शिक्षिका मनिषा कांबळे, अर्पणा गजभिये, सुरेखा हिंगे, रिना किशोर सह शालेय विद्यार्थ्यानी सहकार्य केले.