– जय दुर्गा उत्सव मंडळ , टेलिकॉम नगर तर्फे नितीन गडकरींचा भव्य सत्कार
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि नागपूरचे लोकप्रिय खासदार ना. नितीन गडकरी ह्यांनी नवमी च्या शुभ दिवशी जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर आयोजित नवरात्रोत्सव ला भेट देऊन दुर्गा मातेची पूजा-आरती कार्यक्रमात भाग घेतला. ह्या प्रसंगी ना. नितीन गडकरी ह्यांचे जय-दुर्गा उत्सव मंडळ आणि जय दुर्गा उत्सव महिला मंडळ कार्यकर्त्यांद्वारा पंचारती ने ओवाळून भव्य स्वागत करण्यांत आले.
जय दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष अमोल लोहट आणि सचिव प्रदीप चौधरी ह्यांनी ना. नितीन गडकरी ह्यांचा शॉल आणि श्रीफळ आणि कमळ पुष्पहार द्वारा सत्कार केला. माजी नगरसेवक दिलीप दिवे,, प्रमोद तभाणे, माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, माजी नगरसेविका पल्लवी शामकुळे तसेच मंडळाचे सदस्य सागर कासनगोट्टूवार , दीपक सोनी, प्रवीण पटेल, प्रवीण दाणी, प्रभाकर चौधरी, प्रकाश नाजपांडे, सुरेश रेवतकर, नितीन नायडू, जयंत घारे, प्रसन्न ब्रम्हे, विनय फडणवीस, शैलेश अगस्ती, गिरीश चौधरी, सिद्धेश नाजपांडे , जीवन मुदलियार ,दिलीप चौधरी आणि पवन करणे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
दरम्यान माजी मनपा विरोधी पक्ष नेते प्रफुल्ल गुडधे ह्यांनी देखील मंडळला भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले. प्रफुल्ल गुडधे ह्यांचे देखील ह्याप्रसंगी मंडळ सदस्यांतर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. ह्यावर्षी आयोजित “साई चरण पादुका दर्शन सोहळ्याला देखील हजारो साई भक्तांनी हजेरी लावली आणि श्री साईबाबा ह्यांनी स्वात: धारण केलेल्या पादुकांचे दर्शनाचा लाभ भेटला. उपमुख्यमंत्री ह्यांचे मानद सचिव तसेच माजी महापौर संदीप जोशी, राणाप्रताप नगर चे पोलीस इन्स्पेक्टर काळे आणि इतर हजारो साईभक्तांनी चरण पादुका दर्शनाचा लाभ घेतला. प्रख्यात गायिका आणि समाज सेविका अमृता फडणवीस ( उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सौभाग्यवती ) ह्यानी देखील जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर नवरात्रोत्सव अंतर्गत आयोजित रास गरबा कार्यक्रमात भाग घेऊन गरब्याचा आनंद घेतला आणि उपस्थित सर्व महिला, आणि युवा वर्गाची मने जिंकून घेतली.
जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. ह्यावर्षी झालेल्या महिलांच्या विविध स्पर्धाचे-रांगोळी (मनीषा कुलकर्णी) पाक कला (मीनाक्षी गुंडेवार ), लहान मुलासाठी फॅन्सी ड्रेस-सांस्कृतिक कार्यक्रम (स्वाती भालेराव) , चित्रकला आणि क्रीडा स्पर्धा) तसेच गरबा स्पर्धा (स्नेहा बर्वे) आणि शोएब मेनन (आनंद मेळावा ) ह्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. आशिष श्रीवास्तव ह्यांनी सर्व स्पर्धा बक्षिसे पुरस्कृत केली.
फक्त नवरात्री उत्सव च नव्हे तर वर्षभर जय दुर्गा उत्सव मंडळ आणि जय दुर्गा उत्सव महिला मंडळ तर्फे वर्षभर विविध सामाजिक आणि इतर कार्यक्रम राबविण्यात येतात , ज्या मध्ये जागतिक महिला दिन आणि टेलिकॉम नगर मधील वरिष्ठ महिलांचा सन्मान कार्यक्रम, गुढी पाडवा निमित्य महिलांची स्कूटर रॅली, तसेच सर्वासाठी शेगाव तीर्थाटन यात्रा इ .