संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 31:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील हॉटेल मिठठूलाल जवळील फिर्यादी हिजबुल रहमान खलील उल रहमान यांच्या दुकानाच्या मागच्या दाराला तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानात ठेवलेले एअर कॉम्प्रेसर, पोकलॅण्ड मशीन चा बूम सिलेंडर, तसेच दुकानातील लोहे चे पट्टे असा एकूण 56 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाल्याची घटना 26 मार्च च्या रात्री घडली असता यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 380, 461 अनव्ये गुन्हा दाखल करीत तपासाला दिलेल्या गतीत या चोरी प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून यातील दोन चोरट्याचा शोध लावून त्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 56 हजार रुपयांच्या साहित्यातून 40 हजार रुपये किमतीचे पोकलँड मशीन चा बूम हस्तगत करण्यात आला.अटक आरोपी चे नाव आमिर उर्फ गोलू खान वय 30 वर्षे , अहमद खान शेर खान वय 27 वर्षे दोन्ही राहणार बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसर कामठी असे आहे.
ही यशस्वी कार्यवाही डीसीपी मनीष कलवानिया , एसीपी आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे व पोलीस निरीक्षक गड्डीमे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, हिट स्कॉड चे पोलीस हवा. संदीप सदने, सुरेंद्र शेंडे, कमल कनोजिया, अनिकेत सांगळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.